समित कक्कड पडद्यावर आणणार नार्को क्वीन शशिकला पाटणकर यांची कहाणी
‘नार्को क्वीन’ शशिकला उर्फ बेबी पाटणकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी वेब सिरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिल्ममेकर संजय गुप्ता यांच्या व्हाईट फेदर फिल्म्सच्या बॅनरखाली या वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी समित कक्कड आणि संजय गुप्ता सांभाळणार आहेत. समित यांनी आजवरच्या आपल्या चित्रपटांमधून खऱ्या मुंबईचं दर्शन घडवलं आहे. […]
ADVERTISEMENT

‘नार्को क्वीन’ शशिकला उर्फ बेबी पाटणकर यांच्या जीवनावर आधारित असलेल्या आगामी वेब सिरीजची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध फिल्ममेकर संजय गुप्ता यांच्या व्हाईट फेदर फिल्म्सच्या बॅनरखाली या वेब सिरीजची निर्मिती करण्यात येणार आहे. दिग्दर्शनाची जबाबदारी समित कक्कड आणि संजय गुप्ता सांभाळणार आहेत. समित यांनी आजवरच्या आपल्या चित्रपटांमधून खऱ्या मुंबईचं दर्शन घडवलं आहे.
चित्रपट व्यवसायातील सुमारे दोन दशकांच्या आपल्या प्रवासात, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक समित कक्कड यांनी पडद्यामागे स्थिरावत दिग्दर्शकाच्या रूपात आपली एक वेगळी इमेज तयार करण्यात यश मिळवलं आहे. ‘आश्चर्यचकित’, ‘हाफ तिकीट’, ‘आयना का बायना’ या चित्रपटांसोबतच ‘इंदोरी इश्क’ हा वेब शो आणि सध्या निर्मिती प्रक्रियेत असलेल्या ‘धारावी बँक’मध्ये समित यांचं मुंबईवरील प्रेम हा कॅामन फॅक्टर पहायला मिळतो. वादग्रस्त बार डान्सर स्वीटीवरील बायोपिकचं दिग्दर्शनही समित करत आहेत.