वांद्रे स्थानकावर मजुरांची गर्दी काँग्रेसने जमवली होती?; पोलिसांनी कुणाला केली होती अटक?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

‘देशात कोरोनाचं संकट असताना काँग्रेसच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील मजुरांना फुकट तिकीट देऊन पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये पाठवलं आणि कोरोना पसरवला’, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना केलं. पंतप्रधानांच्या या विधानानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कोरोना काळात मुंबईतील वांद्रे स्थानकावर खरंच काँग्रेस नेत्यांनी गर्दी जमवली होती का? गर्दी जमवण्यामागे कोण व्यक्ती होती? 2020 मध्ये खरंच काय होती स्थिती जाणून घेऊयात…

14 एप्रिल 2020 मध्ये मुंबईतील वांद्रे स्थानकावर दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक महाराष्ट्राबाहेरील स्थलांतरित मजुरांची मोठी गर्दी उसळली होती. झालं असं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊन वाढवण्यात आल्यानंतर रोजगारासाठी मुंबईत आलेल्या पण लॉकडाऊनमुळे काम नसलेल्या स्थलांतरित मजुरांनी 14 एप्रिल रोजीच दुपारी वांद्रे स्थानकावर गर्दी केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वांद्रे रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या जामा मशिदीजवल ही गर्दी जमली होती. दुसऱ्यांदा लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर मजुरांच्या संयमाचा बांध फुटला आणि ते स्थानकाबाहेर जमा झाले होते. मात्र, प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी त्यांची समजूत काढत त्यांना परत पाठवलं होतं.

गर्दी झाली तेव्हा रेल्वे सुरू होती का?

ADVERTISEMENT

काँग्रेस नेत्यांनी मोफत तिकीट वाटल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. मात्र, ज्यावेळी मजुरांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केल्याची घटना घडली, त्यावेळी देशात कडक लॉकडाउन होता आणि प्रवासी रेल्वे सेवा बंद होती. 14 एप्रिल 2020 पासून रेल्वे सेवा सुरू होणार असल्याची माहिती पसरली होती. मात्र, रेल्वे मंत्रालयानेच रेल्वे सेवा सुरू होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर स्थलांतरित मजुरांचे जत्थे पायीच निघू लागल्यानंतर श्रमिक रेल्वे सेवा सुरू करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

रेल्वे स्थानकावर गर्दी कुणी बोलवली?

गर्दीची घटना घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता. स्थलांतरित मजुरांना वांद्रे स्थानकाबाहेर बोलवल्याप्रकरणी एकाला अटक केली होती. विनय दुबे असं या व्यक्तीचं नाव होतं. विनय दुबेला नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून अटक करण्यात आली होती. विनय दुबे उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. त्याच्या आवाहनावरून स्थलांतरित मजुरांनी वांद्रे स्थानकाबाहेर गर्दी केली होती, असं पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT