अविश्वास प्रस्तावामुळे नरहरी झिरवळ यांना आमदारांची अपात्रता ठरवण्याचे अधिकार नाहीत, दोन आमदारांचं पत्र
अविश्वास प्रस्तावामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अपात्रतेचे अधिकारच नाहीत या आशयाचं पत्र दोन अपक्ष आमदारांनी लिहिलं आहे. विनोद अग्रवाल आणि महेश बालदी यांनी पत्र दिलं आहे की उपाध्यक्ष शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. यासाठी त्यांनी २१ जूनच्या बंडखोर आमदारांच्या पत्राचा हवाला दिला आहे. ज्यात बंडखोरांनी नरहरी झिरवळ यांना हटवण्याची मागणी केली आहे. […]
ADVERTISEMENT

अविश्वास प्रस्तावामुळे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अपात्रतेचे अधिकारच नाहीत या आशयाचं पत्र दोन अपक्ष आमदारांनी लिहिलं आहे.
विनोद अग्रवाल आणि महेश बालदी यांनी पत्र दिलं आहे की उपाध्यक्ष शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. यासाठी त्यांनी २१ जूनच्या बंडखोर आमदारांच्या पत्राचा हवाला दिला आहे.
ज्यात बंडखोरांनी नरहरी झिरवळ यांना हटवण्याची मागणी केली आहे. बालदी आणि अग्रवाल यांचं म्हणणं आहे की उपाध्यक्षांच्या पदाविषयी वाद असताना त्यांनी निलंबनाबाबत कोणताही निर्णय त्यांनी घेऊ नये. ही मागणी केली आहे. यासाठी त्यांनी २०१६ च्या अरूणाचल प्रदेश विधानसभेच्या खटल्याविषयीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अहवाल दिला होता. विधान मंडळाच्या सचिवांना हे पत्र देण्यात आलं आहे.
विधानसभा नियम 179 अन्वये नरहरी झिरवळ यांना हटविण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार नाहीत. 2016च्या सर्वोच्च न्यायालयाचा दिला पत्रात दाखला घटनेच्या दहाव्या परिशिष्टाप्रमाणे अध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल असेल तर त्यावर निर्णय होईस्तोवर त्यांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार राहत नाहीत.
नरहरी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव भाजपने दोन दिवांपूर्वीच दाखल केला आहे. त्यामुळे कोणत्याही आमदारांचे निलंबन ते करू शकत नाही. या तारखेनंतर कितीही प्रस्ताव दाखल झाले तरी आधी अविश्वास प्रस्ताव वर निर्णय घ्यावा लागेल. मग आमदारांचे निलंबन, ही एक मोठी राजकीय खेळी आहे जी भाजपने खेळली आहे.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेविरोधात बंड केले आहे. आपल्याला 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले आहे. काल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १२ आमदारांना आणि आज ४ आमदारांचे सदस्यत्व रद्द करावं अशी मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी पलटवार केला आहे. आम्हाला घाबरावयाचा प्रयत्न केला जात असल्याचे शिंदे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे कालच्या ट्विटमध्ये काय म्हणाले होते?
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत.
12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.