Nashik MLC 2023 : सत्यजीत तांबेंनाही काँग्रेस निलंबित करणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nashik MLC Election 2023

ADVERTISEMENT

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सत्यजीत तांबे यांचं निलंबन करण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. प्रदेश काँग्रेसच्यावतीने केंद्रीय काँग्रेसच्या शिस्तपालन समितीला याबाबत शिफारस करण्यात आल्याची माहिती आहे. यापूर्वी सत्यजीत तांबेंचे वडील आणि नाशिक पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांचंही निलंबन करण्यात आलं आहे.

राज्यात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी नाशिक मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला होता. काँग्रेसनं इथून पुन्हा एकदा सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या नावाची घोषणा करण्याबरोबरच एबी फॉर्मही देण्यात आला होता. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या नेत्यांची तारांबळ उडाली. तसंच काँग्रेसमधील विसंवादही चव्हाट्यावर आला होता.

हे वाचलं का?

त्याचवेळी सुधीर तांबेंचे पुत्र आणि युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. तसंच मी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला असला तरी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं त्यांनी सांगितलं, मात्र भाजपचाही पाठिंबा घेण्याची भूमिका त्यांनी घेतली. या प्रकरणानंतर भाजपचा पाठिंबा घेणं हा काँग्रेसशी दगाफटका आहे. सत्यजीत तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली.

यानंतर काँग्रेसनं सुधीर तांबे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. त्यानंतर आता सत्यजीत तांबेंवरही कारवाई करण्याची शिफारस प्रदेश काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले होते नाना पटोले?

नाशिकमध्ये जे झालं त्याची इत्यंभूत माहिती हायकमांडला दिली आहे. पण बंडखोरांना काँग्रेस समर्थन देणार नाही. सत्यजित तांबेंना काँग्रेसचं समर्थन नाही. भाजपला आज दुसऱ्यांचे घर फोडताना आनंद होत आहे. पण त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना याच दुःख कळेल, असं म्हणतं पटोले यांनी भाजपवरही निशाणा साधला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT