Nashik Oxygen Leak चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त-राजेश टोपे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nashik Oxygen Leak- नाशिक ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची चौकशीसाठी सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने अहवाल दिल्यानंतर कारवाई केली जाईल असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनची गळती झाल्याने झाकीर हुसैन रूग्णालयात 22 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेननंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाशिकच्या रूग्णालयाची पाहणी केली त्यानंतर राजेश टोपे यांनी या प्रकरणी सात सदस्यीय समिती नेमली जाईल असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

Nashik Oxygen Leak : 22 मृत्यूंमुळे महाराष्ट्र शोकमग्न आहे-मुख्यमंत्री

चौकशी समितीमध्ये कोण असणार आहे?

हे वाचलं का?

नाशिकमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सात सदस्यीय समिती नेमण्यात आली असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्याने तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम करणाऱ्या लोकांचा समावेश असेल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

चौकशी समितीच्या सूचनांच्या नंतर एसओपी ठरवणार

ADVERTISEMENT

नाशिकच्या दुर्घटनेनंतर आता ऑक्सिजन लिक्विड टँकमध्ये किती साठा आहे, किती प्रेशर आहे याची व्यवस्था करण्याची गरज आहे. त्याचसोबत त्या ठिकाणी 24 तास सुरक्षा रक्षक असणही आवश्यक आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी SOP ठरवण्यात येईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. नाशिकच्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून 5 लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे असंही त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

‘Nashik Oxygen Leak: डॉ. झाकीर हुसैन रूग्णालयात घडलेली घटना दुःखद’

काय घडली घटना?

बुधवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्याची माहिती समोर आली. या दुर्घटनेत सुरूवातीला 10 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मात्र त्यानंतर या दुर्घटनेत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अतीव दुःख व्यक्त केलं आहे. . राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवतो आहे. अशात नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो रूग्णालय परिसरात सगळीकडे पसरला. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा ते पाऊण तास खंडीत झाला होता. जो नंतर पूर्ववत करण्यात आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT