ईडीने अटक केल्यानंतर मलिकांची पहिली प्रतिक्रिया; हात उंचावत म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मागच्या काही तासांपासून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. आता अखेर त्यांना अटक केली आहे. इक्बाल कासकर यानं नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना आज सकाळीच त्यांच्या घरातून चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं होतं. तब्बल आठ तासापासून मलिकांची चौकशी सुरु होती. त्यानंतर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. अटकेची ही कारवाई नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे.

अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया…

नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आलं आहे. नवाब मलिक ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर सर्वात प्रथम हात उंचावून व्हिक्टरी साइन दाखवली. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, ‘लढेंगे आणि जितेंगे डरेंगे नही’,

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नवाब मलिकांना लवकरच कोर्टात केलं हजर

नवाब मलिक यांची काही वेळापूर्वीच जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यावेळी ईडीचे अधिकारी देखील त्यांच्यासोबत होते. आता मलिकांची कोठडी मिळावी यासाठी ईडी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

‘ईडी’वरून राज्यात पेटलं रण; सीतारामन म्हणतात, ‘इच्छा असली तरी तपास थांबवू शकत नाही’

ADVERTISEMENT

नवाब मलिक यांना ईडी कोठडी मिळाल्यास त्यांच्या अडचणीत आणखी भर पडू शकते. नवाब मलिक हे चौकशीत सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करण्यात आलं असल्याचं ईडीच्या खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. दरम्यान, जर कोर्टाने ईडी कोठडी नाकारुन नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी सुनावली तर मलिकांना तात्काळ जामिनासाठी अर्ज करता येईल.

नेमकं प्रकरण काय?

नवाब मलिक यांनी 1993 स्फोटातील आरोपीकडून कुर्ला भागात एक मालमत्ता खरेदी केली होती. कोट्यवधींची किंमत असलेली ही मालमत्ता नवाब मलिकांनी अवघ्या 30 लाखांत खरेदी केली होती. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत केला होता. या जमीन खरेदीत मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी चौकशी केल्यानंतर आता नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

‘थयथयाट तेच लोकं करतात जे…’, नवाब मलिकांबाबत बोलताना आशिष शेलारांची घणाघाती टीका

देवेंद्र फडणवीस यांनी नेमके आरोप केले होते?

‘मुंबईतल्या कुर्ला भागात LBS रोडवर जवळपास तीन एकर जागा आहे. एका गोडाऊनवाल्या कुटुंबाची ही जागा होती. अत्यंत महागडी ही जागा होती. त्याची एक पॉवर ऑफ अॅटर्नी सलीम पटेल आणि शाहवली खान यांच्याकडे होती. या दोघांनी एलबीएस रोडवरची ही जागा सॉलिडस नावाच्या एका कंपनीला विकली आहे.’

‘सॉलिडस कंपनीच्या वतीने या कागदावर सही केली आहे ती फराज मलिक यांनी. ही कंपनी नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे.’ असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.

‘स्वतः नवाब मलिकही काही काळासाठी या कंपनीत संचालक होते. शाहवली खान आणि सलीम पटेल या दोघांनी सॉलिडसला ही जागा फक्त 30 लाखांत विकली आहे. त्यातले 20 लाखच दिले आहेत. मला जी माहिती आहे त्यानुसार भाडे तत्त्वावर ही जागा दिली असेल त्यातून सॉलिडसला एक कोटी रूपये भाडं मिळतं आहे.’

‘2005 मध्ये जो व्यवहार झाला त्यावेळी तिथला दर काय होता? तर त्याच्या मागे पाईपलाईनच्या कच्च्या रोडवर 415 रूपये स्क्वेअर फूटने जागा घेतली ती मलिक कुटुंबाने घेतली होती. याच रोडवर एक जागा 2005 मध्ये एक जागा 2 हजार रूपये स्क्वेअर फूटने विकत घेतली आहे. सॉलिडसने याच वर्षी दोन अंडरवर्ल्डच्या लोकांकडून ही जमीन 25 रूपये स्क्वेअर फूटने घेतली आहे. मुंबईत उकिरड्याची जागाही 25 रूपये चौ. फुटाने घेतली असून 15 रूपये चौ. फुटाने पैसे दिले आहेत. आता प्रश्न हा आहे की मुंबईच्या गुन्हेगारांकडून ही जमीन का विकत घेतली गेली?’

‘बॉम्बस्फोटात आपण माणसांची लक्तरं पाहिली त्याचं प्लानिंग करणारा हा तोच शाहवली खान. भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद आहे. त्याची बहीण हसीना पारकर आणि तिचा फ्रंट मॅन खान यांच्याशी मलिक यांनी व्यवहार का केला? या दोघांनी तुम्हाला ही जमीन इतक्या स्वस्तात कवडी मोलाने का विकली?’

‘आपली संपत्ती सरकारजमा होऊ नये म्हणून विकली गेली. खरंच हा व्यवहार एवढाच झाला की काळा पैसा यात वापरला गेला? सरदार शाहवली खान हा 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. शाहवली खान टायगर मेमनच्या ट्रेनिंगमध्ये होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिका याची रेकी त्याने केली होती. बॉम्बस्फोट होणार आहेत ही सगळी माहिती खान याच्याकडे होती. ज्या अल हुसैनी इमारतीत कारमध्ये आरडीएक्स भरण्यात आलं त्यामध्येही याचा सहभाग होता.’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT