नवाब मलिक तुम्हाला जनता माफ करणार नाही! अमृता फडणवीस यांचा करारा जवाब
आज अमृता फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी काही आरोप केले आहेत. त्या आरोपांना आता अमृता फडणवीस यांनी खरमरीत शैलीत उत्तर दिलं आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. आमच्याकडे काहीच नाही जे नवाब मलिक एक्स्पोज करू शकतात. त्यामुळे ते असे घाणेरडे आरोप करू शकत आहेत. मी आणि […]
ADVERTISEMENT

आज अमृता फडणवीस यांच्यावर नवाब मलिक यांनी काही आरोप केले आहेत. त्या आरोपांना आता अमृता फडणवीस यांनी खरमरीत शैलीत उत्तर दिलं आहे. जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. आमच्याकडे काहीच नाही जे नवाब मलिक एक्स्पोज करू शकतात. त्यामुळे ते असे घाणेरडे आरोप करू शकत आहेत. मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. काही कारण नसताना नवाब मलिक यांच्याकडून चिखलफेक केली जाते आहे असंही अमृता फडणवीस म्हणाल्या. तसंच जनता तुम्हाला यासाठी कधीही माफ करणार नाही असंही त्या म्हणाल्या.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
माझा संपर्क रॅली फॉर रिव्हर्स ही मोहीम राबवणारे सदगुरु यांच्याशी झाला. सदगुरु यांच्या मोठ्या कार्यक्रमात मी सहभागी झाले होते. तेथे मी एक वक्ता होते. त्यानंतर सदगुरु यांच्यासोबत सचिन गुप्ता आणि जयदीप राणा यांना आऊटसोअर्स करण्यात आलं. हे दिग्दर्शक आणि अशिष्टंट होते. या दोघांनी सदगुरु यांच्यासाठी गाणं तयार केलं. या गाण्यावर सर्व बॉलिवूडने गाणं म्हटलं. हे गाणं रिव्हर्र मार्चवाल्यांना आवडलं. याच दोघांना नंतर रिव्हर मार्चने आऊटसोअर्स केलंसचिन गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं तर रॅली फॉर रिव्हर मार्चवाल्यांनी सर्व रेकॉर्डिंग फ्रीमध्ये ठेवलं. कोणीही या गाण्यासाठी पैसा घेतला नाही. या गाण्यात शाहरुख, सलमान यांना आणलं असतं पण यामध्ये कोळी बांधव,डेबवाले आहेत. मला तसेच रिव्हर मार्चच्या लोकांमध्ये राजकीय महत्वाकांक्षा नाही असं आज अमृता फडणवीस म्हणाल्या.