नवाब मलिक समीर वानखेडेंबाबत आणखी कागदपत्रं हायकोर्टात करणार सादर
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडेंबाबत आणखी कागदपत्रं सादर करणार आहेत. नवाब मलिक यांनी एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. हे प्रतिज्ञापत्र नवाब मलिक यांच्या वतीने ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याविरोधात सादर केलं जाणार आहे. गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर मानहानीचा दावा करण्यात आला होता. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे समीर वानखेडेंबाबत आणखी कागदपत्रं सादर करणार आहेत. नवाब मलिक यांनी एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. हे प्रतिज्ञापत्र नवाब मलिक यांच्या वतीने ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याविरोधात सादर केलं जाणार आहे.
ADVERTISEMENT
गेल्या आठवड्यात न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर मानहानीचा दावा करण्यात आला होता. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीनंतर खंडपीठाने वानखेडे मलिक यांच्या विरोधात मनाई आदेशाची मागणी करत असलेल्या अंतरिम टप्प्यातील खटला आदेशासाठी राखून ठेवला होता. हे प्रकरण आधीच राखीव असल्याने, मलिकचे वकील तांत्रिकदृष्ट्या न्यायाधीशांची विशेष परवानगी घेतल्याशिवाय मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करू शकणार नाहीत.
हे वाचलं का?
नवाब मलिक यांच्या वकिलांनी गुरुवारी न्यायमूर्ती जमादार यांच्याकडून सुनावणी होईल या आशेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दुपारी 2.15 वाजता न्यायमूर्ती जामदार यांच्या दालनात हजर राहावे लागेल, असे त्यांनी वानखेडे यांच्या वकिलांना कळवले.
अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करता यावे यासाठी ते परवानगी घेण्यासाठी न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या दालनात जाणार आहेत. दाव्यातील युक्तिवाद तीन तासांहून अधिक काळ सुनावणी होऊन आदेश राखून ठेवण्यात आला असताना वानखेडे यांचे वकील या टप्प्यावर कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे दाखल करण्यास विरोध करण्याची शक्यता आहे. अतिरिक्त प्रतिज्ञापत्र समीर वानखेडे यांच्या काही कागदपत्रांशी संबंधित आहे जे मलिक यांना वानखेडेच्या दाव्याविरुद्ध त्यांचा दावा सिद्ध करण्यासाठी जोडायचे आहे असंही मलिक यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
आशिफ खान-समीर वानखेडे यांच्यात कोणते संबंध आहेत? ; मलिकांनी ‘व्हॉट्सअॅप चॅट’ केले शेअर
ADVERTISEMENT
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध त्यांच्या कुटुंबाची बदनामी केल्याप्रकरणी दावा दाखल केला होता. मुंबईतील नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या विरोधात मालिकाच लावली आहे. नवाब मलिक यांनी विविध आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या जन्म दाखल्यापासून ते त्यांच्या निकाह आणि तलाकपर्यंत अनेक कागदपत्रं त्यांनी समोर आणली होती. त्यावरून आरोपांची राळही उठवली.
समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कॉर्डिलिया क्रूझवर छापा मारून आर्यन खानला अटक केली होती. त्यानंतर ६ ऑक्टोबरला पहिल्यांदा पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी एनसीबीने केलेली ही सगळी कारवाई म्हणजे बनाव आहे असं म्हटलं होतं. त्यानंतर जवळपास प्रत्येक दिवशी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांनी विविध आरोप केले. आता त्यांना समीर वानखेडेंच्या विरोधात आणखी कागदपत्रं सादर करणार असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT