नवाब मलिकांच्या राजीनाम्याबाबत भुजबळांचं मोठं वक्तव्य, सरकारची भूमिका केली स्पष्ट

मुंबई तक

मुंबई: राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. काही वेळापूर्वीच नवाब मलिकांच्या कोठडीसाठी कोर्टात सुनावणी पार पडली. तर दुसरीकडे ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीला तीनही पक्षाचे अनेक मंत्री हजर होते. याच बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी महत्त्वाची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर आता राज्यातील राजकारण प्रचंड तापलं आहे. काही वेळापूर्वीच नवाब मलिकांच्या कोठडीसाठी कोर्टात सुनावणी पार पडली. तर दुसरीकडे ‘वर्षा’वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीला तीनही पक्षाचे अनेक मंत्री हजर होते. याच बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी महत्त्वाची माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार का? याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र याविषयी मीडियाशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं की, ‘नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही. नवाब मलिकांची अटक ही राजकीय हेतूने प्रेरित आहे. 30 वर्षापूर्वीच प्रकरण मुद्दामून उकरुन ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात येणार नाही.’

‘ईडीने फक्त अटक केली म्हणून नवाब मलिक यांचा राजीनामा घेणं चुकीचं ठरेल आजच्या घडीला. जोवर ते न्यायालयासमोर दोषी ठरत नाही तोवर त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. अटकेचाच निकष लावायचा तर काही दिवसापूर्वी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांचा राजीनामा तेव्हा घेतला होता का?’ असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp