नक्षलवाद्यांचा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा; प्रजासत्ताक दिनी गोंदियात झळकले बॅनर-पत्रकं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

व्यंकटेश दुधमवार, गोंदिया

ADVERTISEMENT

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी आज भीक मांगो आंदोलन करत सरकारचं लक्ष वेधलं असतानाच नक्षलवाद्यांनीही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच नक्षलवाद्यांचे बॅनर आणि पत्रकं झळकली आहेत. नक्षलवाद्यांनी मुख्य रस्त्यावर बॅनर आणि पत्रकं लावून एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. मात्र, या बॅनरमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे नक्षलांनी चक्क सालेकसा पोलीस ठाण्यापासून 1 किलोमीटर अंतरावरील सालेकसा-दरेकसा या मुख्य रस्त्यावर बॅनर लावले आहेत. त्याचबरोबर शारदा मंदिराच्या परिसरात पत्रकंही भिरकावण्यात आली आहेत.

हे वाचलं का?

पदर पसरून मागितली भीक; राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं ‘भीक मांगो’ आंदोलन

सालेकसा हा तालुका नक्षलग्रस्त भागात येतो. या ठिकाणी अनेकदा नक्षली चकमकी होतात. आज अचानक बॅनर आणि पत्रक आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे.

ADVERTISEMENT

धक्कादायक! राजापूरमध्ये निलंबित एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, एसटी कर्मचारी आक्रमक

ADVERTISEMENT

नक्षलवादी संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड झोनल कमिटीच्या वतीने पोस्टर, बॅनर आणि पत्रकं लावण्यात आली आहेत. महाराष्ट्र सरकार एसटी कर्मचाऱ्याच्या संपाकडे दुर्लक्ष करत आहेत. हा संप चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, माओवादी संघटना एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचे समर्थन करीत असल्याचं बॅनर आणि पत्रकांमधून म्हटलं आहे.

एसटी महामंडळाचं शासनामध्ये विलिनीकरण करण्यात यावं आणि एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाही केली जाऊ नये. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपच्या जनताविरोधी धोरणांचा आम्ही निषेध करतो, असं या बॅनरमध्ये म्हणण्यात आलं आहे.

धुळे: निलंबनाची प्रत हातात पडताच एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका

पत्रकावर अनंत नावाच्या झोनल प्रवक्त्याची सही आहे. सध्या हा परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून, त्या ठिकाणी सी-60 पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT