प्रभाकरचे फोन रेकॉर्ड काढा, सगळं समोर येईल; गोसावीचा पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीचा व्हिडीओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

क्रूझशिप ड्रग्ज पार्टी प्रकरणातील एनसीबीचा साक्षीदार किरण गोसावी याला पकडण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. पुणे पोलिसांकडून गोसावीविरुद्धची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीचा गोसावीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात गोसावीने प्रभाकर साईलवर गंभीर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

नव्या व्हिडीओत किरण गोसावीने काय म्हटलंय?

‘नमस्कार, मी किरण गोसावी! मी प्रभाकर साईलशी काही बोलू इच्छितो. आज त्याने व्हिडीओ टाकलेला आहे. आरपीआयचं कुणीतरी त्याच्या बाजूला बसलेले आहेत, त्याबद्दल मला काही घेणंदेणं नाही. विषय हा आहे की, तो जे काही बोलतोय… त्याला इथं उभं केलं होतं, तिथे उभं केलं होतं. इतके पैसे घेतले. तितके पैसे घेतले. सॅम डिसोझासोबत संभाषण कुणाचं झालेलं आहे. कुणी किती पैसे घेतले आहेत? प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसात काय ऑफर आलेल्या आहेत? त्याच्या मोबाईलवरून स्पष्टपणे समजेल.’

हे वाचलं का?

Kiran Gosavi : किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात; अटकेची प्रकिया सुरू

‘मी माध्यमांना इतकीच विनंती करतो की, प्रभाकर साईल आणि त्याचे दोन्ही भाऊ यांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाईल संभाषण काढावेत. मोबाईलमधील चॅट्स काढाव्यात. माझे प्रभाकरसोबतचे चॅट्स काढा. मी कुठे बोललोय इतके पैसे घेऊन ये वगैरे. पूर्वीचा माझा आयात-निर्यातीचा व्यवसाय आहे. त्यामध्ये पूर्वीच्या चॅट्स असतील, ज्यात पैशाची देवाणघेवाण असेल.’

ADVERTISEMENT

‘दोन ऑक्टोबरनंतरच्या प्रभाकरच्या चॅट्स बघाव्यात आणि कुणा कुणाशी आणि काय संभाषण झाले, ते डिलीट केले आहेत. ते डिलीट केलेले संभाषण पण काढावेत इतकीच माझी विनंती आहे. मुंबई पोलिसांनी ही केस हाती घेतली आहे, तर सगळ्यात आधी याच्यावर (प्रभाकर) कारवाई करावी किंवा त्याच्याबद्दलची माहिती काढावी. त्याच्या मागे असलेले मंत्री वगैरे सगळ्यांची माहिती काढावी.’

ADVERTISEMENT

क्रूझ छाप्यापासून आजपर्यंत काय काय घडलं वाचा काय म्हणतोय किरण गोसावी?

‘माझं एवढंच म्हणणं आहे की, मी मराठी व्यक्ती असल्याने माझ्या पाठिशी कुणीतरी उभं राहावं. विरोधी बाकावरील असो वा जे सत्तेत आहे. त्यापैकी कुणीतरी माझ्या पाठिशी उभं राहावं. मी जे सांगतोय त्या गोष्टीसाठी मुंबई पोलिसांकडे एक अर्ज करावा, इतकंच माझं म्हणणं आहे. याचे (प्रभाकर) फोन रेकॉर्ड काढा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तो जे आरोप सगळ्यांवर करतोय ते सगळे खोटे आहेत. पैसे यानेच घेतलेले आहेत, त्यामध्ये हा (प्रभाकर) आणि याचे दोन्ही भाऊ मेन आहेत.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT