SRK’s Son: ‘आर्यनच्या फोनमध्ये सापडलेत धक्कादायक फोटो, 11 ऑक्टोबरपर्यंत कस्टडी द्या’, NCB ची मागणी

मुंबई तक

Shahrukh Khan Son Aryan Khan Drug Case Updates: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सापडलेल्या ड्रग्सप्रकरणी शाहरूख खान मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर त्याला कोर्टातही हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं असून यावेळी एनसीबीने आरोपींची […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Shahrukh Khan Son Aryan Khan Drug Case Updates: मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सापडलेल्या ड्रग्सप्रकरणी शाहरूख खान मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. ज्यानंतर त्याला कोर्टातही हजर करण्यात आलं होतं. यावेळी कोर्टाने आर्यन खानसह तिघांना एक दिवसाची एनसीबी कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता त्यांना पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं असून यावेळी एनसीबीने आरोपींची चौकशी करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी केली आहे.

NCB कडून थेट 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडीची मागणी का करण्यात आली?

आर्यन खानची कोठडी मागताना एनसीबीने असं म्हटलं आहे की, आर्यनच्या फोनमध्ये काही फोटो सापडले आहेत जे आक्षेपार्ह आणि धक्कादायक आहेत. त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी देण्यात यावी.

दरम्यान, असं म्हटलं जात आहे की, आर्यनच्या फोनमधून असा काही लिंक मिळाल्या आहेत की, जे आंतरराष्ट्रीय ड्रग्स तस्करीकडे इशारा करत आहे. त्यामुळे आता आर्यन खानच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp