ड्रग्ज प्रकरणात NCBकडून 40 हजार पानी चार्जशीट, रियासह 33 नावं
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधलं ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं होतं. मोठमोठे तारे-तारका एनसीबीच्या रडारव होते त्यांची चौकशीही झाली. एनसीबीने म्हणजेच नार्कोटिक्स विभागाने या प्रकरणात ४० हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीसह ३३ जणांची नावं आहेत अशीही माहिती समोर आली आहे. एनसीबीचे प्रमुख चीफ समीर वानखेडे हे स्वतः चार्जशीट दाखल करण्यासाठी हजर […]
ADVERTISEMENT
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधलं ड्रग्ज प्रकरण उघडकीस आलं होतं. मोठमोठे तारे-तारका एनसीबीच्या रडारव होते त्यांची चौकशीही झाली. एनसीबीने म्हणजेच नार्कोटिक्स विभागाने या प्रकरणात ४० हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीसह ३३ जणांची नावं आहेत अशीही माहिती समोर आली आहे. एनसीबीचे प्रमुख चीफ समीर वानखेडे हे स्वतः चार्जशीट दाखल करण्यासाठी हजर राहिले आहेत.
ADVERTISEMENT
एनसीबीच्या मुंबई युनिटने बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनमध्ये हे पहिलं आरोपपत्र सादर केलं आहे. दरम्यान या आरोपपत्रामध्ये अभिनेत्री सारा अली खान, दिपीका पदुकोण तसंच श्रद्धा कपूर यांनी दिलेल्या जबाबाचाही समावेश आहे. तर यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांची नावं आहेत.
हे वाचलं का?
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीचं नाव या प्रकरणात पुढे आलं होतं. त्यानंतर ड्रग्जच्या प्रकरणात देखील रिया आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात रिया एका महिन्यासाठी तुरूंगात होती. याशिवाय काही ड्रग्ज पेडलर्सनाही अटक करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री सारा अली खान, दिपीका पदुकोण तसंच श्रद्धा कपूर यांचीही नावं पुढे आली. यानंतर एनसीबीकडून या अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT