एनसीबीची टीम शाहरुख खानच्या ‘मन्नत’वरून निघाली; अनन्या पांडेचा फोन जप्त, बजावलं समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर एनसीबी पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये आली आहे. एनसीबीचे पथक आज अभिनेता शाहरुख खानच्या घरी पोहोचले. अधिकाऱ्यांनी ‘मन्नत’वर झाडाझडती घेऊन परतीचा मार्ग धरला. दुसरीकडे अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी एनसीबीने धाड टाकली. अनन्या पांडेला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ऑर्थर रोड तुरुंगात असलेला मुलगा आर्यन खान याला भेटून परतत नाही, तोच अभिनेता शाहरुख खानच्या घरी एनसीबीचं पथक दाखल झालं. आर्यन खानवर ड्रग्जचे सेवन करण्याबरोबरच त्याची विक्री करण्याचाही आरोप असून, या प्रकरणाचा तपास एनसीबीकडून केला जात आहे.

दुपारी साडेबारा-एक वाजेच्या सुमारास एनसीबीचं पथक शाहरुख खानचं निवासस्थान असलेल्या मन्नतवर पोहोचलं. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी घराची तपासणी केली. त्यानंतर आर्यन खान वापरत असलेल्या ईलेक्ट्रॉनिक वस्तू एनसीबीकडे जमा करायला सांगून एनसीबीचं पथक तपासानंतर माघारी फिरलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Aryan Khan-Rhea Chakraborty फोन चॅटिंगमुळे अडकले जाळ्यात, NCB ला काय सापडलेलं मोबाइलमध्ये?

शाहरुख खानच्या मन्नत बंगाल्याबरोबरच अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीही एनसीबीच्या पथकानं धाड टाकली. आर्यन खानच्या व्हॉट्स चॅटशी अनन्या पांडेचा संबंध असल्याची चर्चा असून, त्यामुळेच एनसीबीच्या पथकाने तिच्या घरावर धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

आर्यन खान ऑर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला; हायकोर्टातही लगेच दिलासा नाही

ADVERTISEMENT

आर्यन खाननं एका अभिनेत्री चॅट केल्याचंही एनसीबीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, त्या अभिनेत्रीच्या नावाबद्दल वाच्यता करण्यात आली नव्हती. त्यानंतर आता अनन्या पांडेच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे. एनसीबीने अनन्या पांडेला समन्स बजावलं असून, तिला २ वाजता कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, एनसीबीने अनन्या पांडेचा फोन ताब्यात घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Exclusive : काचेची भिंत अन् १५ मिनिटांचा वेळ; शाहरुख-आर्यनची अशी झाली भेट

आजच शाहरुख खानने ऑर्थर रोड तुरुंगात असलेल्या आपल्या मुलाची म्हणजेच आर्यन खानची भेट घेतली. दोघांमध्ये १८ मिनिटं संवाद झाला. या संवादादरम्यान शाहरुखने आर्यन खानची चौकशी केली. नाश्ता जेवणाबद्दल विचारलं. तसंच त्याचं मनोधौर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT