“बापाचा अंदाज चुकीचा ठरवायचा हे मुलगीच करू शकते” शरद पवार सुप्रिया सुळेंबाबत असं का म्हणाले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सुप्रिया राजकारणात पडेल हे मला वाटलं नव्हतं. मी ३० वर्षांपूर्वी मुलाखतीत ते बोललोही होतो. पण तुम्ही सगळे पाहात आहात की ती राजकारणात आली आहे. एका बापाचं असेसमेंट चुकीचं कसं आहे माझ्या मुलीनेच सिद्ध केलं असं भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. पुणे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने सिंगल डॉक्टर फॅमिली या उपक्रमाची सुरूवात झाली. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत शरद पवारांनी हे भाष्य केलं. हे भाष्य करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

ADVERTISEMENT

वेदांता ग्रुपवर माझा विश्वास नाही असं का म्हणाले शरद पवार?

काय घडलं मुलाखतीत?

ही मुलाखत घेत असताना एक AV प्ले करण्यात आली. ही AV एका मुलाखतीची होती. शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची मुलाखत ३० वर्षांपूर्वी जब्बार पटेल यांनी घेतली होती. त्यावेळी शरद पवार हे म्हणाले होते की सुप्रिया राजकारणात येईल असं मला वाटत नाही. शरद पवारांचं ते वाक्य ऐकून कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सगळ्यांमध्येच हशा पिकला. ती क्लीप संपल्यानंतर शरद पवार म्हणाले की आत्ता तुम्ही जे पाहिलंत त्यात मी ३० वर्षांपूर्वी बोललो होतो. सुप्रिया राजकारणात येणार नाही. पण बापाचा अंदाज चुकवायचा कसा हे मुलगीच करू शकते. हे जेव्हा शरद पवार म्हणाले तेव्हाही सभागृहात हशा पिकला.

हे वाचलं का?

एकाच अपत्याला जन्म देण्याच्या निर्णयावर काय म्हणाले शरद पवार?

एकाच अपत्याला जन्म देण्याचा निर्णय घेतल्यावर तुम्हाला कोणता सामना करावा लागला? असा प्रश्न विचारला गेला असता शरद पवार म्हणाले मी एका गावात निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलो होतो. त्यावेळी मला एका वयस्कर गृहस्थाने विचारलं तुम्हाला एकच मुलगी का? मी म्हटलं हो.. मग ते गृहस्थ म्हणाले की उद्या तुमचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या चितेला अग्नी कोण देणार? म्हणजे लोकांना अग्नी कोण देणार याची काळजी मात्र मला ती काळजी नव्हती. माझी मुलगी सगळं करू शकते हे मी तेव्हा त्यांना सांगितलं असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.

ADVERTISEMENT

विधानसभेत, लोकसभेत महिला सदस्यांची संख्या वाढवायची असेल तर मानसिकता बदलणं आवश्यक

विधानसभेत आणि लोकसभेत जर महिला सदस्यांची संख्या वाढवायची असेल तर मानसिकता बदलायला हवी. आम्ही म्हणजेच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना योग्य दिशा दाखवायला हवी. लोकसभा आणि विधानसभेत महिलांची संख्या कमी का आहे? तर महिला निवडून येईल याची खात्री आजही अनेकांना वाटत नाही. महिला निवडून आलीच तर ती आपलं काम करेल का? याचीही खात्री नसते त्यामुळे मतदारांची मानसिकता असते.

ADVERTISEMENT

महिलांची संख्या वाढवायची असेल तर त्यासाठी ही मानसिकता बदलावी लागेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर शरद पवार म्हणाले की जर मुलीला एखादं काम सांगितलं तर ती त्या कामावर लक्ष केंद्रीत करते आणि ते काम करून इतर जबाबदाऱ्या पाडते. उलट मुलांना काम सांगितलं तर ते त्या कामावर लक्ष केंद्रीत न करता इतर गोष्टी करत राहातात असंही पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT