राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या; राष्ट्रपती, PM मोदींनी निकाल लावावा : शरद पवार
मुंबई : माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा काय तो निकाल लावावा, अशा व्यक्तीला अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देण योग्य नाही, असं म्हणतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर मागील काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात महाराष्ट्रभरात आंदोलन आणि निदर्शन […]
ADVERTISEMENT

मुंबई : माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा काय तो निकाल लावावा, अशा व्यक्तीला अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या देण योग्य नाही, असं म्हणतं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर मागील काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात महाराष्ट्रभरात आंदोलन आणि निदर्शन केली जात असून त्यांना हटविण्याची मागणी होत आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पदवीदान सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपस्थितांना संबोधित केलं होतं. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील नायक असून नवीन काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत नायक असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. राज्यपालांवर टीका करताना केंद्र सरकारने त्यांना माघारी बोलावावे अशी मागणी केली जात आहे.
याचबाबत आज पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, राज्यपाल ज्यावेळी बोलले त्यावेळी मी स्वतः तिथे उपस्थित होतो. ते जे काही बोलले त्यात त्यांनी माझा काही उल्लेख केला नाही, पण गडकरींबद्दल बोलले. सतत वादग्रस्त वक्तव्य करणं असा या राज्यपालांचा लौकीक आहे. चुकीची विधानं करणं, समाजामध्ये गैरसमज वाढतील याची खबरदारी घेणं, असा त्यांचा विचार आहे की काय याची शंका येते.
आधी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आणि आता थेट महाराजांबद्दलचा उल्लेख या सगळ्यांवरुन वाटतं की या पदावर बसणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते, याचं यत्किंचितही भान नसलेली व्यक्ती महाराष्ट्रात पाठविलेली आहे. राज्यपाल ही एक घटनात्मक संस्था आहे, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल फार बोललो नव्हतो. पण छत्रपती शिवरायांबद्दलचं वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.