सत्तेच्या गैरवापराचं हे उदाहरण, अशी कारवाई होईल याची कल्पना होतीच – शरद पवार
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी ईडीचं पथक नवाब मलिकांना चौकशीसाठी कार्यालयात घेऊन आलं आहे. दाऊदचा हस्तक सरदार खानकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी मलिक यांची चौकशी केली जात आहे. ईडीच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. ईडीच्या या कारवाईवर […]
ADVERTISEMENT

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. आज सकाळी ईडीचं पथक नवाब मलिकांना चौकशीसाठी कार्यालयात घेऊन आलं आहे. दाऊदचा हस्तक सरदार खानकडून बाजारभावापेक्षा कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी मलिक यांची चौकशी केली जात आहे. ईडीच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
ईडीच्या या कारवाईवर काय बोलावं, यात बोलण्यासारखं काहीच नाही. नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहता अशी काहीतरी कारवाई केली जाईल याचा आम्हाला अंदाज होताच असं शरद पवार म्हणाले.
हा महाराष्ट्र सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न ! मलिकांच्या ईडी चौकशीवर राऊतांची प्रतिक्रीया
“सत्तेचा गैरवापर कसा गेला जातोय याचं हे उत्तम उदाहरण आहे. या कारवाईक काय प्रतिक्रीया देणार, यात नवीन काहीच नाही. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक ज्या पद्धतीने बोलत होते ते पाहता कधी ना कधी त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल याची आम्हाला कल्पना होतीच.” यावेळी शरद पवारांनी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर बोलण्यास नकार दिला.