NCP च्या नेत्याकडून सुप्रिया सुळेंचा विश्वासघात?, ‘तो’ किस्सा चर्चेत
Supriya Sule interview : नागालँडंमध्ये राष्ट्रवादीने (NCP) सत्ताधारी एनडीपीपी (NDPP) आणि भाजप (BJP) आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने अचानक घेतलेल्या या भूमिकेने नागालँडसह (Nagaland) महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शवलाय, तिथल्या सरकारला नाही,अशी भूमिका मांडली. हीच भूमिका सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी देखील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर […]
ADVERTISEMENT

Supriya Sule interview : नागालँडंमध्ये राष्ट्रवादीने (NCP) सत्ताधारी एनडीपीपी (NDPP) आणि भाजप (BJP) आघाडीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीने अचानक घेतलेल्या या भूमिकेने नागालँडसह (Nagaland) महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दर्शवलाय, तिथल्या सरकारला नाही,अशी भूमिका मांडली. हीच भूमिका सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी देखील पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मांडली होती. या भूमिकेनंतर आता एका किस्स्यामुळे सुप्रिया सुळे चर्चेत आला आहे. हा किस्सा एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याच्या संदर्भातला आहे. हा नेता सुप्रिया सुळे यांचा विश्वासघात करून भाजपात गेला होता. हा नेता कोण आहे? अशी चर्चा आता राजकिय वर्तुळात रंगली आहे. (ncp leader betrayed and went to bjp supriya Sule told that story)
सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला एका युट्यूबरला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. या मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या त्या नेत्याचा किस्सा सांगितलाय. तुमचा कोणी विश्वासघात केला आहे का? असा प्रश्न त्यांना मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर त्यांनी असे अनेक जण आहेत. पण मला त्यांचे नाव सांगायचे नाही आहे,असे म्हणत त्यांनी पक्षाशी संबंधित एक किस्सा सांगितला. या किस्स्यामध्ये त्यांनी त्या बड्या नेत्याचे नाव घेणे टाळले आहे.
ED च्या अटकेपूर्वीच सोमय्यांनी बातमी फोडली, सदानंद कदम ईडीच्या ताब्यात
सुप्रिया सुळे (Supriya sule) यांचा एका राष्ट्रवादीच्याच बड्या नेत्याने विश्वासघात केला होता. गेल्या अनेक वर्षापासून तो नेता पक्षासाठी काम करत होता. तो पक्ष सोडून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावेळस मी त्याला फोन करून जाब विचारला असता, त्याने एका समस्येचे कारण देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. पुढे सुप्रिया सुळे यांनी त्यांना घरी चर्चेसाठी बोलावत,जर मला खरंच वाटलं तुम्हाला जाण्याची गरज आहे, तर तुम्ही खरंच जा, असा सल्लाही दिला.