महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय? आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला
महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जातो आहे. याचं कारण आहे ते म्हणजे गेल्या तीन दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर होते त्यावेळी ते एकनाथ खडसेंच्या घरी […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय काय? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जातो आहे. याचं कारण आहे ते म्हणजे गेल्या तीन दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी. सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर होते त्यावेळी ते एकनाथ खडसेंच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी भाजप खासदार रक्षा खडसेंची भेट घेतली होती. मात्र देवेंद्र फडणवीस हे खडसेंच्या घरी गेल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या. या चर्चा थांबत नाहीत तोच आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शरद पवारांची भेट घेतली. एकनाथ खडसे यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले एकनाथ खडसे?
आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेबांची सदिच्छा भेट घेतली. शास्त्रक्रियेपश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे पण उपस्थित होते असंही खडसे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हे वाचलं का?
पवार-फडणवीस भेटीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?
मागचे दोन दिवस काय घडलं?
ADVERTISEMENT
सोमवारी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट होती म्हणून सांगितलं असलं तरी या भेटीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली होती. देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट डॅमेज कंट्रोलसाठी घेतली असावी अशीही चर्चा झाली. मात्र तसं काहीही नाही उलट डॅमेज कंट्रोलची गरज ही महाविकास आघाडी सरकारला आहे असंही उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तर संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत उत्तम विरोधी पक्ष म्हणून कसं काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नक्कीच केलं असेल असं म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या वक्तव्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. संजय राऊत यांची अवस्था ना घर का ना घाटका अशी झाली आहे असंही फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सत्तेचा मंत्र दिला का? संजय राऊत यांनी दिलं उत्तर
मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौरा केला. या दौऱ्याच्या सुरूवातीलाच देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांच्या घरी गेले होते. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात विस्तवही जात नाही हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर विविध आरोप करतच खडसेंनी भाजपला जय श्रीराम केलं होतं. आता आज तेच एकनाथ खडसे हे शरद पवारांच्या घरी दाखल झाले आहेत. ही भेट सदिच्छा भेट असली तरीही याचे विविध राजकीय अर्थ लावले जात आहेत यात शंका नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT