शरद पवार UPA चे अध्यक्ष होणार? राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीत प्रस्ताव मंजूर

मुंबई तक

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल १० मार्चला लागले. त्यानंतर देशात पुन्हा भाजपचीच लाट आहे हे दिसून आलं. कारण पंजाब वगळता इतर चारही राज्यांमध्ये भाजपने मैदान मारलं आहे. त्यानंतर आता तयारी सुरू झाली आहे ती २०२४ च्या निवडणुकांची. अशात शरद पवार यांना युपीएचं अध्यक्ष करण्यात यावं असा प्रस्ताव दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत एकमताने संमत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल १० मार्चला लागले. त्यानंतर देशात पुन्हा भाजपचीच लाट आहे हे दिसून आलं. कारण पंजाब वगळता इतर चारही राज्यांमध्ये भाजपने मैदान मारलं आहे. त्यानंतर आता तयारी सुरू झाली आहे ती २०२४ च्या निवडणुकांची. अशात शरद पवार यांना युपीएचं अध्यक्ष करण्यात यावं असा प्रस्ताव दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत एकमताने संमत करण्यात आला आहे. त्यामुळे आता शरद पवार हे युपीएचं अध्यक्षपद सांभाळणार अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

बाप-लेकीचं अतूट नातं! लतादीदींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळचा शरद पवार सुप्रिया सुळेंचा फोटो व्हायरल

२०१४ मध्ये राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुका लढण्यात आल्या. मात्र काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीतही काँग्रेसचा पराभव झाला. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभावाची धूळ चारण्यात भाजपला यश आलं. यानंतर काँग्रेस कार्यकारिणीची जी बैठक झाली त्या बैठकीत पुन्हा एकदा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या तिघांनीही राजीनामा देऊन नवा अध्यक्ष नेमला जावा असा प्रस्ताव मांडला. राहुल गांधी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. युपीएच्या अध्यक्षा म्हणून सोनिया गांधी काम पाहात आहेत. आता मात्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत शरद पवार यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद दिलं जावं हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. दिल्लीत झालेल्या बैठकीत शरद पवारही उपस्थित होते. या प्रस्तावामुळे आता नेमकं राष्ट्रीय राजकारणात काय होणार? हा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp