विनामास्क व्यक्तींकडून BMC ने आतापर्यंत वसूल केले ‘इतके’ कोटी रुपये, आकडा पाहून तुम्हीही व्हाल थक्क
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता या नियमांसह मास्क घालणंही बंधनकारक करण्यात आलंय. परंतू अजुनही काही लोकं घराबाहेर फिरताना मास्क लावत नाहीत. मुंबईत अशा लोकांकडून आतापर्यंत महापालिका, पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ६४ कोटींच्या घरात रक्कम दंड म्हणून वसूल केली आहे. विनामास्क बाहेर फिरणाऱ्यांवर २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. […]
ADVERTISEMENT
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असताना सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता या नियमांसह मास्क घालणंही बंधनकारक करण्यात आलंय. परंतू अजुनही काही लोकं घराबाहेर फिरताना मास्क लावत नाहीत. मुंबईत अशा लोकांकडून आतापर्यंत महापालिका, पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ६४ कोटींच्या घरात रक्कम दंड म्हणून वसूल केली आहे.
ADVERTISEMENT
विनामास्क बाहेर फिरणाऱ्यांवर २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
२८ ऑगस्टपर्यंत रेल्वे, पोलीस आणि महापालिका यांनी मिळून मास्क न घालता बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडून ६४ कोटी ५७ लाख ५३ हजार ४०० रुपये दंड गोळा गेला आहे. कोरोनाचा मुंबईत शिरकाव झाल्यापासून प्रशासनाने मास्क घालून फिरणं बंधनकारक केलं आहे. एकट्या मुंबई महापालिकेने यात ५५ कोटींच्या घरात रक्कम दंड म्हणून वसुल केली आहे. मुंबई पोलीसांनी ८ कोटींच्या घरात तर रेल्वे अधिकाऱ्यांनी आतापर्यंत ५० हजारांच्या घरात रक्कम दंड म्हणून वसुल केली आहे.
हे वाचलं का?
लोकल प्रवासादरम्यान तसेच तिकीटं खरेदी करतानाही मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलंय. लोकांकडून मास्कच्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्यासाठी महापालिकेने क्लिनअप मार्शल्सची नेमणूक केली आहे. मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात असली तरीही आगामी सणांचे दिवस लक्षात घेता राज्य सरकारने गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT