ऋषी कपूर यांना सोडून निघून जाणार होत्या नीतू कपूर, पण…

मुंबई तक

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील फेमस कपल म्हणजे नीतू कपूर आणि ऋषि कपूर..40 वर्ष या दोघांनी एकत्र घालवली आहेत. दरम्यान गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ऋषि कपूर यांचं निधन झालं. मात्र नितू कपूर यांच्यासोबत ऋषि कपूर यांच्या आठवणी मात्र ताज्या आहेत. दरम्यान नुकतंच नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या सोबतचा एक खास किस्सा सांगितला आहे. Now part of […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील फेमस कपल म्हणजे नीतू कपूर आणि ऋषि कपूर..40 वर्ष या दोघांनी एकत्र घालवली आहेत. दरम्यान गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ऋषि कपूर यांचं निधन झालं. मात्र नितू कपूर यांच्यासोबत ऋषि कपूर यांच्या आठवणी मात्र ताज्या आहेत. दरम्यान नुकतंच नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्या सोबतचा एक खास किस्सा सांगितला आहे.

नीतू कपूर त्यांच्या नात्याबद्दल गमतीशीरपणे बोलताना म्हणाल्या की, “आम्ही 37 वर्षे एकत्र आहोत. आणि दिवसातून एक वेळ अशी येते जेव्हा मला वाटते की, बस्स आता मी निघून जायला हवं. मात्र मी त्यांच्या चांगुलपणाबद्दल विचार करते आणि थांबते.”

ऋषी कपूर यांच्या निधनानंतर नीतू कपूर यांनी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात एका स्पर्धकाने गाणं गायलं आणि त्यामध्ये नीतू यांना ऋषी कपूर यांची झलक दिसली.

यावेळी एक किस्सा सांगताना नीतू कपूर म्हणाल्या, “ऋषी कपूर पॅरिसला असताना मी कश्मीरला माझ्या सिनेमाचं शूटींग करत होते. अचानक मला ऋषि यांचा टेलिग्राम मिळाला. त्यांनी मला प्रपोज केलं होतं. त्यावेळी मला फार धक्का बसला होता.”

हे वाचलं का?

    follow whatsapp