सरकारी नाट्यगृहांचा हलगर्जी कारभार, एसी बिघडला, कलाकारांनी अतिउकाड्यात केला प्रयोग, प्रेक्षकांची नाराजी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सरकारी नाट्यगृह अत्यंत हलाखीच्या आणि गलिच्छ परिस्थितीत आहेत. याच्या बातम्या सतत समाजमाध्यमांवर येत असतात. अनेक कलाकारांनीही नाटकाच्या प्रयोगावेळी महाराष्ट्रातील कित्येक थिएटर्सच्या हलाखीच्या परिस्थितीचं चित्रण समाजमाध्यमांवर मांडलं आहे…गेलं दीड वर्ष ही नाट्यगृहं कोरोनामुळे बंद होती. आता पुन्हा नाट्यगृहं सुरू झाली आहेत. मराठी नाटकांचे प्रयोग नाट्यगृहात सुरू झाले आहेत. मात्र या नाट्यगृहांची परिस्थिती मात्र जैसे थे चं आहे.. मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिर या सरकारच्या अखत्यारित असलेल्या नाट्यगृहात पुन्हा एकदा हा सरकारी हलगर्जीपणा दिसून आला..

ADVERTISEMENT

रविवारी दुपारी मुंबईतील प्रभादेवी येथे असलेल्या रविंद्र नाट्यगृहात खरं खरं सांग या नाटकाचा प्रयोग होता.. मात्र हा प्रयोग सुरू होण्यापूर्वीच या नाटकात काम करणाऱ्या कलाकारांना निर्मात्यांना कळलं की रविंद्र नाट्यमंदिराच्या एसी मध्ये बिघाड झाला आहे. एसी बंद असल्याची किंवा बिघाड झाल्याची कोणतीही पूर्वसूचना कलाकारांना, नाटकाच्या निर्मात्यांना रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रशासनाकडून आधी कळवण्यात आली नव्हती. उलट एसीचं काम सुरू आहे, लवकरच एसी सुरू करू अशी हमी या कलाकारांना देण्यात आल्यावर. नाटकातील कलाकारांनी नाटकाच्या प्रयोगाला सुरवात केली.

हे वाचलं का?

रविंद्र नाट्यमंदिरात खरं खरं सांग या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांचीही तुंडुंब उपस्थिती होती. आधीच उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना बंद नाट्यगृहात एसी सुरू नसल्याने कलाकार आणि प्रेक्षक दोघांच्याही शरीरातून घामाच्या धारा वाहत होत्या. तरीही कलाकारांनी शो मस्ट गो आँन म्हणत भर उकाड्यातही प्रयोग सुरूच ठेवला.. मात्र अति उकाड्यामुळे जमलेल्या प्रेक्षकांपैकी काही जणांनी आरडाओरडा सुरू केला. नाटकातील प्रमुख कलाकार आनंद इंगळे यांनी सगळ्यांच्या वतीने माफीही मागितली. आणि यात आमची चुक नसून रवींद्र नाट्यमंदिर व्यवस्थापनाची चूक आहे असंही वारंवार सांगत होतं. मात्र काही प्रेक्षकांनी अरेरावी करण्यास सुरवात केली. यानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी जाहीर केले की ज्या प्रेक्षकांना उकाड्यामुळे त्रास होत असेल त्यांना तिकीटाचे पैसे परत मिळतील असं जाहीर केलं तरीही काही प्रेक्षकांना स्वतःला आवरता आलं नाही आणि ‘आरडा-ओरडा’ याची अरेरावी झाली. हळूहळू प्रकरण शांत झालं आणि बहुसंख्येने प्रेक्षकांनी प्रयोग सुरू करायचा आग्रह धरला. त्यातील अनेक प्रेक्षक घरी परतले, ज्यांना तिकिटाचे पैसे परत दिले गेले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

नाटकाच्या निर्मात्यांची यातील कलाकारांची यात काही एक चूक नसताना काही मोजक्या प्रेक्षकांना अरेरावी करत कलाकारांनाच अतिउकाड्याबद्दल जबाबादार धरले. किमान ६० ते ७० प्रेक्षकांनी अतिउकाड्यामुळे नाटक अर्ध्यावर टाकत, आपले पूर्ण पैसे घेत नाट्यगृहाच्या बाहेर पडले. पण बाकी प्रेक्षकांनी त्या उकाड्यातही पुढे प्रयोग सुरू ठेवण्याची विनंती केली.. आणि पुढे प्रयोग सुखरूप पार पडला..

या सगळ्यात रविंद्र नाट्यमंदिर व्यवस्थापन आणि हे व्यवस्थापन चालवणाऱ्या राज्य सरकारचा पुन्हा एकदा बेजाबदारपणा आणि हलगर्जी दिसून आली.. राज्यातील अनेक नाट्यगृहं सरकारी अनास्थेमुळे वाईट अवस्थेत आहे. यामध्ये वेळीच बदल करणे गरजेचे आहे. आणि याकडे सांस्कृतिक खात्याने, मुंबईच्या पालकमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालणे अगत्याचे ठरणार आहे,

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT