Maharashtrea Weather : राज्यातील 'या' भागांमध्ये कोरडं हवामान, काही ठिकाणी पावसाचा अंदाज जारी
Maharashtrea Weather : 7 नोव्हेंबर रोजी हवामानाची एकूण परिस्थिती ही नेमकी कशी असेल जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
काही भागातील वातावरण कोरडं राहिल
हवामान विभागाने जारी केला महत्त्वाचा इशारा
Maharashtrea Weather : हिवाळा ऋतू सुरु झाला असला तरी राज्यात नोव्हेंबर महिन्यात किमान सरासरीच्या तुलनेत काही ठिकाणी हलक्या पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. तसेच काही भागातील वातावरण कोरडं राहिल असा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे. अशातच आता 7 नोव्हेंबर रोजी हवामानाची एकूण परिस्थिती ही नेमकी कशी असेल जाणून घ्या.
हे ही वाचा : RSS च्या कार्यक्रमातील पिट्या भाईचा 'तो' फोटो, राज ठाकरेंनी झापझाप झापलं, म्हणाले, कशाला टाईमपास करतो?..
कोकण विभाग :
कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. तसेच ठाणे, मुंबई, पालघर, रायगड या जिल्ह्यात हवामान विभागाने कोरडं वातावरण राहिल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. तसेच रत्नागिरी या जिल्ह्यात हवामान विभागाने हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र :
मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यात कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा या दोन जिल्ह्यात हलका ते हलक्या पावसासह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. तसेच सांगली आणि सोलापूरात कोरडं हवामान आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हवामान कोरडं राहिल असा अंदाज वर्तवला आहे.










