Nihar Thackeray: काकांविरोधात पुतण्या.. दिल्लीत जाऊन शिंदेंसाठी लढला!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऐश्वर्या पालिवाल, नवी दिल्ली

ADVERTISEMENT

Nihar Thackeray with Shinde Group in Election Commission Hearing: नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) हा अद्यापही चालूच आहे. त्यातच खरी शिवसेना (Shiv Sena) आणि धनुष्यबाण कोणाचा यावरुन राजधानी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगात (Central Election Commission) आज (10 जानेवारी) जोरदार युक्तिवाद पाहायला मिळाला. मात्र या सगळ्यात अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या युक्तिवादाच्या वेळेस उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पुतणे निहार ठाकरे (Nihar Thackeray) हे स्वत: त्यांच्या विरोधात उभे ठाकले होते. ते यावेळी शिंदे गटाच्या वकिलांच्या पॅनलला देखील कायदेशीर मदत करत होते. त्यामुळे सख्खा पुतण्या हाच आपल्या काकांविरोधात लढत असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. (nephew against uncle nihar thackeray fought for shinde group against uddhav thackeray in delhi)

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या सुनावणीनंतर निहार ठाकरे यांनी मुंबई Tak सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत करताना ठाकरेंनी चुकीच्या पद्धतीने शिवसेना पक्ष चालवला याबाबत भाष्य केलं. पाहा निहार ठाकरे नेमकं काय म्हणाले.

हे वाचलं का?

‘आज निवडणूक आयोगासमोर आम्ही आमचा युक्तिवाद केला आहे. आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवलं आहे की, बहुमत कसं आमच्यासमोर आहे. मग तो सभागृहातील पक्ष असो किंवा संघटनात्मक पक्ष. आता विधानसभेतील 40 आमदार आणि 13 खासदार आमच्यासोबत आहेत. तसंच संघटनेच्या पातळीवर पक्षही आमच्यासोबत आहे. हे देखील आम्ही आयोगाला सांगितलं आहे.’

असं म्हणत निहार ठाकरे यांनी शिंदे गटाची बाजू कशी योग्य आहे हे मांडण्याचा प्रयत्न केला.

Shiv Sena: शिंदेंनी ऐनवेळी टाकला नवा डाव, ठाकरेंना गमवावं लागणारं धनुष्यबाण?

ADVERTISEMENT

‘दुसरी गोष्ट आम्ही ही गोष्ट आयोगासमोर ठेवली की, कसं शिवसेनेची जी घटना आहे ती चुकीच्या पद्धतीने बदलली गेली. बाळासाहेब ठाकरे हयातीत असताना लोकशाही पद्धतीची पक्षाची घटना अस्तित्वात होती. 1999 मध्ये जी घटना तयार करण्यात आली होती ती लोकशाही पद्धतीतील होती.’

‘जे देखील सदस्य होते किंवा, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य असोत किंवा बाळासाहेब ठाकरे हे पक्षात निवडून जायचे. 2018 मध्ये ही घटना बदलण्यात आली होती. जी निवडणूक प्रक्रिया आहे तीच हटविण्यात आली होती. ही गोष्ट चुकीची आहे तीच गोष्ट आम्ही निवडणूक आयोगाला सांगितली आहे.’

‘आम्ही असं म्हणत नाही की, उद्धव ठाकरेंचं पद चुकीचं आहे आम्ही हे म्हणतोय की, ज्या पद्धतीने पक्ष चालवला जात होता ते चुकीचं आहे.’

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरेंकडे शिवसेना पक्षप्रमुख नाही, शिंदे गटाचा स्फोटक दावा

‘निवडणूक आयोगासमोर जो वाद आहे तो पक्ष आणि चिन्ह याबाबत आहे. निवडणूक आयोग हे ठरवणार आहे की, कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या गटाला चिन्ह द्यायचं.’ असं निहार ठाकरे यावेळी म्हणाले.

कुटुंबीयच उद्धव ठाकरेंविरोधात

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर ठाकरे कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. उद्धव ठाकरे यांचे दिवंगत भाऊ बिंदूमाधव यांच्या कुटुंबीयांनी आधीच उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतली होती. तर दुसरे बंधू जयदेव ठाकरे यांनी तर संपत्तीच्या वादावरुन उद्धव ठाकरेंना कोर्टात खेचलं होतं.

दरम्यान, जेव्हा उद्धव ठाकरेंनी आपलं मुख्यमंत्री पद गमावलं आणि शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाले तेव्हा बिंदूमाधव ठाकरेंचं पुत्र निहार ठाकरे, जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे या सगळ्यांनी थेट उघडपणे एकनाथ शिंदेंची जाहीरपणे भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता.

कुटुंबातील हे मनभेद एवढ्यावरच थांबलेले नाहीत तर आता आपल्या सख्ख्या काकांना राजकीय दृष्ट्या संपूर्णपणे नामोहरम करण्यासाठी निहार ठाकरे हे स्वत: रिंगणात उतरले आहेत. अशावेळी या राजकीय विरोधकांसोबत कुटुंबातील आपल्या विरोधात उभ्या ठाकलेल्या सदस्यांशी उद्धव ठाकरे कसा लढा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT