MPSC परीक्षेबाबत अत्यंत मोठी बातमी, परीक्षेची तारीख जाहीर!
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षेबाबत आता एक अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. एमपीएससी परीक्षेबाबत काल जो गोंधळ झाला होता त्यानंतर आयोगाने आज (12 मार्च) एक पत्रक काढून थेट परीक्षेची तारीखच जाहीर केली आहे. अधिकृत पत्रकानुसार संबंधित परीक्षा ही रविवार, 21 मार्च 2021 रोजी म्हणजे पुढच्याच आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याच्या […]
ADVERTISEMENT

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षेबाबत आता एक अत्यंत मोठी अपडेट समोर आली आहे. एमपीएससी परीक्षेबाबत काल जो गोंधळ झाला होता त्यानंतर आयोगाने आज (12 मार्च) एक पत्रक काढून थेट परीक्षेची तारीखच जाहीर केली आहे. अधिकृत पत्रकानुसार संबंधित परीक्षा ही रविवार, 21 मार्च 2021 रोजी म्हणजे पुढच्याच आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे.
परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाने झाला होता गदारोळ
MPSC ची राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर काल (11 मार्च) पुढे ढकलण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं होतं. राज्यसेवा पूर्व परीक्षा १४ मार्चला होणार होती पण अवघे तीन दिवस राहिलेले असताना ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं घोषित करण्यात आलं होतं.
या निर्णयामुळे पुण्यात संतप्त विद्यार्थी हे रस्त्यावर उतरले होते. याआधी ही परीक्षा दोनवेळा कोरोना संकटामुळेच पुढे ढकलण्यात आली होती.