पासपोर्टसाठी लांब चकरा मारणं थांबणार, डोंबिवलीत नव्या पासपोर्ट सेवा केंद्राचा शुभारंभ
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या भागांत राहणाऱ्या नागरिकांची पासपोर्टसाठीची होणारी वणवण आता संपणार आहे. कारण डोंबिवलीच्या MIDC परिसरातील पासपोर्ट ऑफिसमध्ये नव्या पासपोर्ट सेवा केंद्राचं आज उद्घाटन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा आज पार पडला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी मोठा पाठपुरावा केला होता. […]
ADVERTISEMENT
ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर या भागांत राहणाऱ्या नागरिकांची पासपोर्टसाठीची होणारी वणवण आता संपणार आहे. कारण डोंबिवलीच्या MIDC परिसरातील पासपोर्ट ऑफिसमध्ये नव्या पासपोर्ट सेवा केंद्राचं आज उद्घाटन करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा आज पार पडला. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी मोठा पाठपुरावा केला होता.
ADVERTISEMENT
ठाण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एम एम आर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होते. त्यामुळे आता डोंबिवली एम.आय.डी.सी. येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्याने ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपशहरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
डोंबिवलीत पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे २०१७ पासून पाठपुरावा करत होते.तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला असल्याचे खासदार शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले. अखेर सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे आज केंद्रीय संचार राज्यमंत्री देवूसिंह यांच्या हस्ते या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. मुंबई उपनगरातील हा १३वा व भारतातील ४२८ वा पासपोर्ट सेवा केंद्र आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT