मुख्यमंत्री शिंदेंकडून शिवसेनेच्या नवीन नियुक्त्या जाहीर; गुलाबराव पाटील, उदय सामंतांवर मोठी जबाबदारी

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेच्या (Shivsena) नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली आहेत. शिवसेनेच्या सचिवपदी कामगार नेते किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांची शिंदे यांनी सचिव पदावर नियुक्ती केली आहे.

ADVERTISEMENT

गुलाबराव पाटील, उदय सामंत यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी

अगोदर जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आमदार दीपक केसरकर हेच पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी कायम राहणार आहे. याशिवाय शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत, किरण पावसकर, आमदार गुलाबराव पाटील आणि दहिसरच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेली आहे. तर अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांची पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे किरण पावसकर आणि संजय मोरे याना देण्यात आली आहे. तर बाकी शिलेदारांना देखील ती लवकरच देण्यात येतील. या नियुक्त्यांमुळे पक्षाचे काम अधिक जोमाने करता येणे शक्य होणार असून पक्ष विस्तारासाठी देखील हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे

हे वाचलं का?

एकनाथ शिंदेंनी बदलली होती राष्ट्रीय कार्यकारिणी

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी तयार केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुधीर जोशी, संजय राव, सुभाष देसाई, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंद गीते, आनंदराव अडसूळ, आनंद राव, एकनाथ शिंदे यांचा समावेश होता.

शिंदे यांनी ही कार्यकारिणी बरखास्त करून त्यांच्यावतीने नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पुन्हा नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, शिवाजीराव पाटील, विजय नाहाटा आणि शरद पोंक्षे यांची उपनेतेपदी, तर दीपक केसरकर यांची नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT