‘…त्यावेळी तुम्ही जनतेच्या भावना भडकावल्या असत्या का?’; केसरकरांचा उद्धव ठाकरेंना सवाल
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उलट सवाल केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही दीपक केसरकर यांनी टीकास्त्र डागलं. दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे “आज भावना भडकावल्या जात आहेत, त्या कितपत योग्य आहे, याचा विचार करा. कारण आज जे मुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उलट सवाल केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही दीपक केसरकर यांनी टीकास्त्र डागलं.
दीपक केसरकर यांच्या पत्रकार परिषदेतील मुख्य मुद्दे
“आज भावना भडकावल्या जात आहेत, त्या कितपत योग्य आहे, याचा विचार करा. कारण आज जे मुख्यमंत्री झाले आहेत, त्यांना तुमच्या पक्षप्रमुखांनीच मुख्यमंत्री करतो असं आश्वासन दिलं होतं. बाळासाहेब दिलेलं आश्वासन पुर्ण करायचे. पण इथे दिलेलं आश्वासन पूर्ण केलंच नाही. उलट ते (एकनाथ शिंदे) स्वतः तुमच्याकडे आले (उद्धव ठाकरे) आणि तुम्हीच मुख्यमंत्री रहा असं सांगितलं.”
“जर मोदींबरोबर बोलणी सुरू होती, तर त्या परिस्थितीतही तुम्हाला त्या पदावरून उतरावंच लागलं असतं. जरी अडीच वर्षांचा फॉर्म्युला होता. त्यामुळे अडीच वर्षानंतर पदावरून उतरावं लागलं असतं. त्यावेळी तुम्ही जनतेच्या भावना भडकावल्या असत्या का हा प्रश्न आहे.”
“राज्याला शांतता हवी आहे. राज्याला शांतता द्यायची की नाही, याचाही विचार केला पाहिजे. २०१४ साली आमचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी रोज सकाळी पत्रकार परिषदे असायची. रोज दिल्लीवर टीका असायची, इथं राज्य व्यवस्थित चालावं अशी तुम्ही अपेक्षा करत होतात. मग ते घडत नव्हतं. त्याला जबाबदार कोण होतं? रोज सकाळी ९ वाजता कोण बोलत, हे महाराष्ट्राला माहितीये.”