जाहिरातीत पंतप्रधान मोदींकडे मागितली 500 बिलियन डॉलर्स गुंतवणुकीची संमती, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

मुंबई तक

सध्या एका जाहिरातीचा विषय सोशल मीडियाच नव्हे तर सगळीकडेच रंगला आहे. वृत्तपत्रात आलेली ही जाहिरात पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोणत्याही जाहिरातीचा उद्देश हा असतो की ते आपलं लक्ष चटकन वेधून घेतात. या जाहिरातीने ते घेतलं आहे. याचं कारण आहेत पंतप्रधान मोदी आणि 500 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक. काय आहे जाहिरातीत? या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

सध्या एका जाहिरातीचा विषय सोशल मीडियाच नव्हे तर सगळीकडेच रंगला आहे. वृत्तपत्रात आलेली ही जाहिरात पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोणत्याही जाहिरातीचा उद्देश हा असतो की ते आपलं लक्ष चटकन वेधून घेतात. या जाहिरातीने ते घेतलं आहे. याचं कारण आहेत पंतप्रधान मोदी आणि 500 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक.

काय आहे जाहिरातीत?

या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना परवानगी मागणारं एक पत्र आहे. भारतात 500 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करतो मला भेटीची वेळ द्या अशी संमती मागणारं एक पत्र जाहिरातीत आहे. इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करायची आहे असं म्हणणारी कंपनी कुठली आहे? काय करते? याचा आम्ही शोध घेतला. Landomus Realty Ventures Inc, USA असं या कंपनीचं नाव आहे.

National Infrastructure Pipeline (NIP) and Non-NIP प्रकल्पांमध्ये आमची गुंतवणूक करण्याची इच्छा आहे असं या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आलं आहे. ही गुंतवणूक थोडी थोडकी नाही तब्बल 500 बिलियन डॉलर्सची आहे.