निलेश माझीरे पुन्हा पक्षात; राज ठाकरेंनीच केली नियुक्ती, वसंत मोरे म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून धुसपूस सुरु आहे. पक्षाचे माथाडी सेनेचे अध्यक्ष निलेश माझीरे यांनी यालाच कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. राजीनामा देताना त्यांनी पुण्यातील मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांवर आरोप केले होते. निलेश माझीरेंना वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाते. त्यांनीच पक्षाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा निलेश माझीरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यपदी निवड करण्यात आली आहे. स्वत: राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे वसंत मोरेंचा मावळा परतला असे म्हणता येईल.

ADVERTISEMENT

वसंत मोरे यांनीही वेळोवेळी पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांवर आरोप केले आहेत. जोपर्यंत राज ठाकरे येणार नाहीत तोपर्यंत शहर कार्यालयात जाणार नाही अशी ठाम भूमिका वसंत मोरे यांनी घेतली होती. त्याचबरोबर वसंत मोरे यांनी पुणे मनसेमधून बाहेर फेकल्याचेही चित्र सध्या आहे. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावं लागले होते. त्यानंतर सातत्याने वसंत मोरे शहरातील नेत्यांवर आरोप करत आहेत.

निलेश माझीरे यांनी राजीनामा म्हणजे पुणे मनसेसाठी फार मोठा धक्का मानला जात होता. शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही काही दिवसांपुर्वी निलेश माझीरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. परंतु राज ठाकरेंना निलेश माझीरेंची मनधरणी करण्यात यश आले आहे. त्यांना पुन्हा माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यपदी निवडण्यात आले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT