नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, मंगळवारी सुनावणी
भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणात ही अटक होऊ शकते. या प्रकरणी आता नितेश राणे यांनी जामिनाठी अर्ज केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणेंना […]
ADVERTISEMENT

भाजप आमदार नितेश राणेंना अटक होण्याची शक्यता आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला प्रकरणात ही अटक होऊ शकते. या प्रकरणी आता नितेश राणे यांनी जामिनाठी अर्ज केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मुख्य आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.
सचिन सातपुतेच्या अटकेनंतर आता शिवसेनेने भाजप आमदार नितेश राणेंना अटक करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिसऱ्यांना नितेश राणेंना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र नितेश राणे हे एकदाही चौकशीसाठी आले नाहीत. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते आहे. नितेश राणे यांच्या घरीही पोलीस गेले होते मात्र तेव्हा नितेश राणे तिथे नव्हते.
नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे. याबाबत कोर्ट नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
जिल्हा बँक निवडणुकीमुळे सिंधुदुर्गातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना घडली असून, या प्रकरणात आता आमदार नितेश राणे यांना अटक केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही अशी शंका व्यक्त केली असून, त्यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.