कोणताही प्रश्न आला तरीही महाराष्ट्राच्या मागे उभे राहणारे नेते म्हणजे नितीन गडकरी-शरद पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं कौतुक केलं आहे. पुण्यातल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या वतीने साखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात शरद पवार आणि नितीन गडकरी Nitin Gadkari एकाच मंचावर होते. यावेळी शरद पवांनी नितीन गडकरी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत शरद पवार?

साखर कारखानदारीसाठी राज्य सरकारची मदत हवी असते, आत्ताच्या राज्य सरकारमध्ये उसाबद्दल, कारखानदारीबद्दल जाण असलेले अनेक सहकारी आहेत. त्यामुळे त्यांची मदत होईल. आज केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील उसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर त्यांच्या मागे एक व्यक्त भक्कमपणे उभी असते ती व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी. ते आज या साखर परिषदेत आले आहेत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

सर्वांच्या प्रयत्नाने आपण साखर उद्योगात यश मिळवलं, साखर उद्योगात आता महाराष्ट्र क्रमांक एकवर गेला आहे. या क्षेत्रात प्रगती झाली याचा आम्हाला आनंद आहे मात्र आता पुढील दिशा शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात ऊस सोडून इतर कुठल्याही पिकाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे ऊस पिकवणं गैर नाही, विदर्भात उसाचं उत्पादन वाढेल यासाठी आपण काळजी घेतली गेली पाहिजे. त्यासाठी विदर्भात व्हीएसआयची शाखा काढण्याची मागणी नितीन गडकरी यांनी केली आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता येईल. जमीन जाईल, त्याचे पैसे व्हीएसआय देईल असंही शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

ADVERTISEMENT

भारतातली साखर १२१ देशांमध्ये पोहचली, सध्याच्या घडीला अफगाणिस्तान हा साखरेचा सर्वात मोठा ग्राहक आहे. तिथली परिस्थिती बदलली आहे. देशात साखरेचं विक्रमी उत्पादन झालं आहे. मागच्या तीन हंगामात कारखान्यांनी निर्यातीला प्राधान्य दिलं असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

वसंतदादा शुगर इन्सिट्युटच्या वतीने राज्यस्तरीय साखर परिषद २०२२ कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बाळासाहेब पाटील दिग्गजांची उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT