‘सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, हाच प्रॉब्लेम’; नितीन गडकरींनी मोदी सरकारचे टोचले कान?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपच्या संसदीय समितीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना वगळण्यात आलं. गडकरींना बाजूला करण्यावरून वेगवेगळ्या कारणांची चर्चा होत असतानाच रविवारी गडकरी त्यांच्या भाषणामुळे पुन्हा चर्चेचा विषय ठरले. ‘NATCON 2022’च्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी एक विधान केलं. त्यावरून गडकरींनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारचेच कान टोचल्याचं बोललं जातंय.

ADVERTISEMENT

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सच्या वतीने ‘NATCON 2022’चं आयोजन करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी मोदी सरकारला घरचा आहेर दिलाय.

नितीन गडकरी सरकारच्या भूमिकेवर काय म्हणाले?

‘NATCON 2022’च्या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे आणि वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. पण, सरकारची सर्वात मोठी समस्या आहे, ती म्हणजे सरकार वेळेवर निर्णय घेत नाही.”

हे वाचलं का?

नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले, “भारतात बांधकाम क्षेत्राचं भविष्य चांगलं आहे. त्यासाठी आपल्याला जगातील नवं तंत्रज्ञान आत्मसात करावं लागेल. आपल्याकडे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या मालाला सुद्धा पर्याय शोधावे लागतील. जेणेकरून प्रकल्पाच्या गुणवत्तेशी तडजोड न करता, किंमत कमी करत येईल”, असं नितीन गडकरींनी कार्यक्रमात बोलताना सांगितलं.

“खरं सांगायचं तर आमच्याकडे पैशांची समस्या नाहीये. बँका वाटेल तेवढं कर्ज देण्यास तयार आहेत. प्रश्न मानसिकतेचा आहे. पैसा उभा राहतो. पैशांची अडचण येत नाही. प्रोजेक्ट आखले जातात. पण ते वेळेवर पूर्ण होत नाही, याची खंत वाटते. म्हणून माझं प्राधान्य हे प्रकल्पांच्या आखणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे असतं”, असं नितीन गडकरी म्हणाले.

ADVERTISEMENT

“माझ्या खात्याबद्दल सांगायचं झालं, तर भारतभर धडाक्यात प्रोजेक्ट सुरु आहेत. अनेकानेक महत्वकांक्षी प्रोजेक्टवर काम सुरुये. सध्या टोलमधून वर्षाला ४० हजार कोटी आम्हाला उत्पन्न मिळतंय. २०२४ पर्यंत हेच उत्पन्न १ लाख ४० हजार कोटीच्या आसपास असेल. आता प्रकल्प उभारणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील, याकडे लक्ष द्यायला हवं”, असं नितीन गडकरी म्हणाले.

ADVERTISEMENT

संसदीय मंडळातून नितीन गडकरींना वगळले

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कार्यरत आहेत. गेल्या आठवड्यात भाजपने संसदीय समितीत बदल केले. संसदीय समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे. गडकरींना संसदीय समितीतून वगळण्यात आल्यानं त्यांना बाजूला करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

देवेंद्र फडणवीसांना बढती

भाजपनं नितीन गडकरींना वगळतानाच महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना बढती दिलीये. देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आलं आहे. ही समिती लोकसभा आणि राज्यसभा उमेदवारांची निवड करते. त्यामुळे फडणवीसांचं भाजपच्या राष्ट्रीय वर्तुळात वजन वाढल्याचं म्हटलं जातंय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT