Nitin Gadkari : 10 कोटी खंडणी प्रकरणात मुलगी अन् बेळगावचे कनेक्शन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nitin Gadkari news :

नागपूर : केंद्रीय मंत्री (Union Minister) आणि भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं कार्यालय उडवून देण्याच्या धमकीने नागपुरात (Nagpur) एकच खळबळ उडाली होती. गडकरी यांच्या कार्यालयात तीन वेळा कॉल आला आणि समोरच्या व्यक्तीने पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कार्यालय उडवून देऊ अशी धमकी दिली होती. दरम्यान, आता या प्रकरणात मोठी घडामोड घडली असून यात मुलगी आणि बेळगावचे कनेक्शन समोर आले आहे. (Nitin Gadkari’s office received three calls and the person on the other side demanded money)

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन गडकरी यांच्या कार्यालयातील धमकी कॉलचा तपास नागपूर पोलिसांनी सुरू केला आहे. या तपासात एका तरुणीचे कनेक्शन समोर आले आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव जयेश पुजारी असल्याचं सांगितलं होतं. मात्र जयेश कर्नाटकातील बेळगाव मध्यवर्ती कारागृहात फाशीची शिक्षा भोगत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, ज्या नंबरवरून धमकीचा कॉल आला तो नंबर एका मुलीच्या नावे रजिस्टर्ड असून, ती बंगळुरूची रहिवासी आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करते. पण पोलीस तिथे पोहोचले तेव्हा कळलं की, मुलगी आजारी असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि या मुलीचा मित्र बेळगावी कारागृहातच बंद आहे, अशा परिस्थितीत नागपूर पोलिसांनी आता त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

उद्धव ठाकरे ते माहिमचा दर्गा : राज ठाकरे काय म्हणाले?

ADVERTISEMENT

मागील वेळीही 14 जानेवारीला नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणारे 3 कॉल आले होते. त्यानंतर 100 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली होती आणि फोन करणारा जयेश उर्फ ​​जपेश कांता एस. बेळगावी (कर्नाटक) तुरुंगात फाशीची शिक्षा भोगत असलेला उर्फ ​​शाकीर उर्फ ​​साहिर नावाचा एक व्यक्ती होता, तेव्हापासून पोलीस या प्रकरणी तब्बल 2 महिने चौकशी करत असून, पुन्हा एकदा त्याच नावाने नितीन गडकरी यांना धमक्या दिल्याचे इनकमिंग कॉल वाढत आहे, त्यामुळे अनेक प्रश्न वाढतं आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT