खळबळजनक प्रकरण! एका ‘योगी’च्या मनाप्रमाणे चित्रा रामकृष्ण घ्यायच्या NSE चे निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (National Stock Exchange) माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांनी 20 वर्ष एका हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार निर्णय घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भारतीय सुरक्षा आणि नियमन मंडळ म्हणजेच सेबीकडून (Securities and exchange board of India) हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

नॅशनल स्टॉच एक्सचेंजच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चित्रा रामकृष्ण या हिमालयातील योगीच्या सांगण्यानुसार निर्णय होत्या. सेबीने रामकृष्ण आणि इतर अन्य अधिकाऱ्यांविरुद्ध दिलेल्या अंतिम आदेशात या गोष्टीचा खुलासा केला आहे.

चित्रा रामकृष्ण यांनी त्यांच्या कार्यकाळात एका हिमालयातील योगीच्या सांगण्यावरूनच आनंद सुब्रमण्यम यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकाच्या सल्लागार पदावर नियुक्त केले होतं, असं सेबीने म्हटलं आहे. चित्रा रामकृष्ण यांनी सुब्रमण्यम यांना मनमर्जीप्रमाणे अनेकवेळा पगारवाढ दिली. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या कामाच्या मूल्याकंनाचे कोणतेही पुरावे नाहीत, असं सेबीने आदेशात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सेबीकडून शुक्रवारी हा आदेश काढण्यात आला. चित्रा रामकृष्ण यांनी आर्थिक आणि व्यावसायिक योजना, आर्थिक परिमाण आणि इतर अन्य गोपनीय माहिती त्या योगीला दिली. त्याचबरोबर एनएसईमधील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसंदर्भातही त्यांनी योगीशी चर्चा केली.

चित्रा रामकृष्ण हिमालयातील योगीला शिरोमणी मानायच्या. 20 वर्षांच्या कार्यकाळात व्यावसायिक आणि वैयक्तिक निर्णयासंदर्भात त्या योगीचा सल्ला घेऊन निर्णय घ्यायच्या, असंही सेबीने म्हटलं आहे. चित्रा रामकृष्ण या 2013 ते 2016 या कालावधीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.

ADVERTISEMENT

आनंद सुब्रमण्यम यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये एप्रिल 2013 मध्ये मुख्य रणनीति सल्लागार म्हणून ऑफर देण्यात आली होती. त्यांना वर्षाला 1.68 कोटी रुपये पॅकेजची ऑफर मिळाली होती. त्यापूर्वी ते Balmer and Lawrie येथे मध्य श्रेणीत व्यवस्थापनामध्ये कार्यरत होते. त्याचं मार्च 2013 मध्ये एका वर्षाचं पॅकेज 15 लाख रुपयांपेक्षाही कमी होतं. त्याचबरोबर त्यांना भांडवली बाजाराचा कोणताही अनुभव नव्हता.

ADVERTISEMENT

एप्रिल 2014 मध्ये सुब्रमण्यम यांच्या वर्षाच्या पॅकेजमध्ये वाढ करण्यात आली. 1.68 कोटींवरून त्यांचं पॅकेज 2.01 कोटी रुपये करण्यात आलं. 2015 मध्ये पुन्हा पॅकेज वाढवून 3.33 कोटी रुपये करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालक सल्लागार पदीवर नियुक्त करण्यात आलं होतं. 2016 मध्ये त्यांचं वर्षाच्या पॅकेज 4.21 कोटी रुपयांवर पोहोचलं होतं.

या प्रकरणात सेबीने रामकृष्ण यांना तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर एनएसई, आनंद सुब्रमण्यम आणि एनएसईच्या अन्य माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रवि नारायण यांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर तत्कालीन मुख्य रेग्युलेटरी अधिकारी आणि वी. आर. नरसिह्मा यांना 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सेबीने चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यम यांना कोणत्याही मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इंस्टीच्युशन अथवा सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या कोणत्याही मध्यस्थ संस्थेसोबत काम करण्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. तर नारायण यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT