Supreme Court :बांठिया आयोगानुसार निवडणुका घ्या, दोन आठवड्यात कार्यक्रम जाहीर करा
OBC आरक्षणासह निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया आयोगानुसार निवडणूक घ्या, दोन आठवड्यात कार्यक्रम जाहीर करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोठा दिलासा दिला आहे. दोन वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहेत याकडेही सुप्रीम कोर्टाने लक्ष वेधलंय. दोन आठड्यात निवडणुका जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केल्यामुळे महानगर पालिका आणि इतर राज्यातील निवडणुकाचा […]
ADVERTISEMENT

OBC आरक्षणासह निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया आयोगानुसार निवडणूक घ्या, दोन आठवड्यात कार्यक्रम जाहीर करा असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोठा दिलासा दिला आहे. दोन वर्षांपासून निवडणुका प्रलंबित आहेत याकडेही सुप्रीम कोर्टाने लक्ष वेधलंय.
दोन आठड्यात निवडणुका जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केल्यामुळे महानगर पालिका आणि इतर राज्यातील निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला आहे. बांठिया अहवालानुसार निवडणुका घ्या, असंही कोर्टानं स्पष्ट केले आहे. राज्य सरकारचे वकील शेखर नाफडे यांनी युक्तीवाद केला. सादर केलेल्या अहवालात बऱ्याच त्रुटी असल्याचं याचिकाकर्ते विकास गवळी यांनी सांगितलं.
बांठिया कमिशन अहवालानुसार राज्यातील पुढील निवडणुका घ्यायला हव्या असं आमचं मत आहे. जाहीर झालेल्या निवडणुकांना स्थगिती दिलेली नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आता कार्यक्रम जाहीर करावा असंही कोर्टाने म्हटलं आहे.
बांठिया आयोगाच्या अहवालातले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत?
११ मार्च २०२२ ला बांठिया कमिशनची स्थापना झाली, हा अहवाल ७७९ पानांचा आहे