Omicron चा सौम्य संसर्गही ‘या’ अवयवांवर करतोय गंभीर परिणाम, नव्या स्टडीमधला दावा

मुंबई तक

ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा धोका जगभरात वाढतो आहे. हा व्हेरिएंट सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणं असणारा आहे असं सांगितलं जातं आहे. मात्र जर्मनीतल्या आरोग्य तज्ज्ञांनी या व्हेरिेएंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात हे म्हटलं आहे कोरोना व्हायरसचा सौम्य संसर्गही मोठा परिणाम करून जातो आहे. रूग्णांमध्ये लक्षणं दिसत नसली तरीही या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा धोका जगभरात वाढतो आहे. हा व्हेरिएंट सौम्य किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणं असणारा आहे असं सांगितलं जातं आहे. मात्र जर्मनीतल्या आरोग्य तज्ज्ञांनी या व्हेरिेएंटबाबत चिंता व्यक्त केली आहे. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात हे म्हटलं आहे कोरोना व्हायरसचा सौम्य संसर्गही मोठा परिणाम करून जातो आहे. रूग्णांमध्ये लक्षणं दिसत नसली तरीही या व्हायरस व्हेरिएंटचा परिणाम होतो आहे असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढतो आहे. फारशी लक्षणं नसलेला ओमिक्रॉन संसर्गही अनेकांमध्ये आढळून येतो आहे. अशात एक महत्त्वाचं निरीक्षण या अहवालातून आणि अभ्यासातून समोर आलं आहे. या प्रयोगासाठी SARS COV 2 संसर्ग जालेल्या 45 ते 74 या वयोगटातील सुमारे 443 लोकांची चाचणी करण्यात आली. हे सगळे या प्रयोगात सहभागी झाले होते. त्यातून हे निरीक्षण समोर आलं आहे की संसर्ग न होणाऱ्यांच्या तुलनेत ज्यांना सौम्य संसर्ग आहे किंवा मध्यम संसर्ग आहे त्यांना मीडियम टर्म ऑर्गन डॅमेज होतो आहे.

या बाबत अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी सांगितलं की फुफ्फुसांच्या क्रियाशीलतेवर कोरोना संसर्गाचा तीन टक्के परिणाम दिसून आला. त्याचप्रमाणे श्वासनलिकेशी संबंधितही काही अडचणी या अभ्यासात दिसून आल्या. हृदयाची धडधड करण्याची क्षमता एक टक्क्याने कमी झाल्याचे दिसून आले. तर रक्तातील प्रथिनांचं प्रमाण 41 टक्क्यांपर्यंत वाढलेलं दिसलं. ज्यामुळे हृदयावर ताण येण्याची शक्यता बळावते असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

अभ्यासकांचं हेही म्हणणं आहे की ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संर्ग झाल्यानंतर कोरोनाची काही सौम्य आणि मध्यम स्वरूपाची लक्षणं दिसून येतात. त्याचा परिणाम बऱ्याचदा फुफ्फुसांवर झालेला पाहण्यास मिळतो. एक चांगली बाब ही आहे की रूग्णांच्या मेंदूच्या क्रियाशीलतेवर याचा फारसा काही परिणाम किंवा कोणताही वाईट परिणाम झाल्याचं पाहण्यास मिळत नाही. सुरूवातीलाच कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने रूग्णाला ग्रासलं आहे हे समजू शकलं तर रूग्णावर योग्य पद्धतीने उपचार करता येताता.

हे वाचलं का?

    follow whatsapp