Omicron : ओमिक्रॉनने वाढवली काळजी, दिवसभरात महाराष्ट्रात 144 नवे रूग्ण
महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्याचप्रमाणे ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांमध्येही भर पडते आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दिवसभरात नवे 144 रूग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत. कुठे आहेत हे 144 रूग्ण मुंबई-100 नागपूर-11 ठाणे आणि पुणे मनपा-7 पिंपरी चिंचवड-6 कोल्हापूर -5 अमरावती, उल्हासनगर, भिवंडी-प्रत्येकी 2 पनवेल आणि उस्मानाबाद- प्रत्येकी […]
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्याचप्रमाणे ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांमध्येही भर पडते आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दिवसभरात नवे 144 रूग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिले आहेत.
ADVERTISEMENT
कुठे आहेत हे 144 रूग्ण
मुंबई-100
हे वाचलं का?
नागपूर-11
ठाणे आणि पुणे मनपा-7
ADVERTISEMENT
पिंपरी चिंचवड-6
ADVERTISEMENT
कोल्हापूर -5
अमरावती, उल्हासनगर, भिवंडी-प्रत्येकी 2
पनवेल आणि उस्मानाबाद- प्रत्येकी 1
एकूण – 144
महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रूग्णांची एकूण संख्या आता 797 झाली आहे. यातले 508 रूग्ण एकट्या मुंबईत आहेत. पुणे मनपामध्ये 78 रूग्ण, पिंपरी चिंचवडमध्ये 44, ठाणे मनपा 29, पुणे ग्रामीण 26, नागपूर 24, पनवेल 17, नवी मुंबई 10, कोल्हापूर 10, सातारा 8, कल्याण डोंबिवली 7, उस्मानाबाद 6, भिवंडी 5, वसई विरार 4, नांदेड 3, अमरावती 3, उल्हासनगर 3, औरंगाबाद 2, बुलढाणा 2, मीरा भाईंदर 2, सांगली 2, लातूर 1, अहमदनगर 1, अकोला 1, रायगड 1 असे आहेत.
यातील 26 रूग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी एक रूग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहेत. 7 रूग्ण ठाणे आणि चार रूग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. 9 रूग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रूग्ण आढळले आहेत.
यातील 330 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात 1 नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचंही क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून 2541 नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 102 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.
Covid 19 : कोरोना रडवतोय! मुंबईत दिवसभरात 15 हजार 166 रूग्णांची नोंद
महाराष्ट्रात कोरोनाचे 26 हजार 538 रूग्ण
महाराष्ट्रात दिवसभरात 26 हजार 538 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 8 मृत्यू झाल्याचंही नोंदवलं गेलं आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा सुरू झाला आहे हेच हे आकडे सांगत आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 5331 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 65 लाख 24 हजार 247 कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.55 टक्के झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
वाढत्या कोरोना रूग्ण संख्येमुळे मुंबई लोकल बंद होणार का? आयुक्त इकबाल चहल म्हणाले…
मुंबईत दिवसभरात 15 हजार 166 रूग्णांची नोंद
मुंबईत दिवसभरात 15 हजार 166 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत कोरोना रूग्ण संख्या चांगलीच वाढली आहे हे दिसून येतं आहे. आज दिवसभरात 1218 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज दिवसभरात 714 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 384 मृत्यू झाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT