काळजी वाढली.. Omicron मुळे महाराष्ट्राला धडकी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: नव्या रूपातल्या कोरोनानं भारतात एंट्री केल्याने आता महाराष्ट्राचं टेन्शन मात्र वाढलं आहे. कारण कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने महाराष्ट्राला वेढा घालायला सुरवात केली आहे. कोरोनाचा अत्यंत धोकादायक व्हेरिएंट मानला जाणाऱ्या ओमिक्रॉनचा तिसरा रूग्ण भारतात आढळला आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या बाजूचे दोन राज्य कर्नाटक आणि गुजरातमधे ओमिक्रॉन व्हेरिएंटचे तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन आता महाराष्ट्राच्या सीमेवर येऊन धडकला आहे. म्हणूनच आता महाराष्ट्राला देखील धडकी भरली आहे.

शेजारच्या राज्यांत ओमिक्रॉनचे रूग्ण आढळत असल्याने महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या तोंडावर शेजारच्या राज्यांत नव्या व्हेरिअंटचे रूग्ण सापडल्याने काळजी वाढली आहे.

हे वाचलं का?

कर्नाटकसह गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला

गुजरातच्या आरोग्य खात्याच्या मते, संक्रमित व्यक्ती झिम्बॉम्बेमधून आली होती. बाधित व्यक्तीचं वय 72 वर्ष असून ते 28 नोव्हेंबरला भारतात आले होते. श्वास घेण्यास त्रास होण्यासोबतच आजारपणाची काही लक्षणं दिसल्याने त्यांनी स्वतःहून खासगी लॅबमध्ये टेस्ट केली.

ADVERTISEMENT

गुरुवारी त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतरच त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते. संबंधित व्यक्तीला जामनगरमधीलच डेंटल कॉलेजमधल्या कोव्हिड-19 हॉस्पिटलमध्ये वेगळं ठेवण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

जीनोम सिक्वेन्सिंगसाठी दोन नमुने घेण्यात आले. यातला एक नमुना गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर आणि दुसरा पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्यात आला आहे. एनआयव्हीचा रिपोर्ट अजून येणं बाकी आहे. बाधित व्यक्ती ही झिम्बॉम्बे नागरिकची असून त्यांची पत्नी जामनगरची आहे.

गेल्या गुरुवारीच देशात पहिल्यांदाच ओमिक्रॉनच्या दोन केसेस आढळल्या होत्या. दोन्ही केसेस शेजारच्या कर्नाटक राज्यातील होत्या.

शेजारच्या राज्यात ओमिक्रॉनचे रूग्ण आढळत असल्याने महाराष्ट्र सरकारनेही खबरदारीचा उपाय म्हणून वेगवेगळे निर्बंध लावायला सुरवात केली आहे.

मुंबई महापालिकेने परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी होम क्वारंटाईनचे नियम जारी केले आहेत. तसंच परदेशातील आलेल्या जवळपास 30 प्रवाशांचे नमुने महाराष्ट्र सरकारने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले आहेत.

Covid 19: भारतात Omicron चा आणखी एक रुग्ण सापडला, कोणत्या राज्यात आढळून आला हा नवा रुग्ण?

30 प्रवाशांच्या नमुन्यांची प्रतिक्षा सुरू असतानाच आता शेजारच्या गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा रूग्ण आढळल्याने महाराष्ट्रातल्या लोकांचं टेन्शन वाढवलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT