परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या 12 जणांचा अजूनही ठिकाणा सापडेना; काहीजणांची घरं बंद
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सतर्कता बाळगली जात असून, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महानगरांसह इतर जिल्ह्यांतही सावधगिरी बाळगली जात आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 318 जण परदेशातून आले असून, त्यापैकी 12 जणांचा अजूनही ठिकाणा सापडत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या 318 नागरिकांपैकी 306 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. तर इतर […]
ADVERTISEMENT

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सतर्कता बाळगली जात असून, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या महानगरांसह इतर जिल्ह्यांतही सावधगिरी बाळगली जात आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत 318 जण परदेशातून आले असून, त्यापैकी 12 जणांचा अजूनही ठिकाणा सापडत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
परदेशातून कल्याण-डोंबिवलीत आलेल्या 318 नागरिकांपैकी 306 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. तर इतर 12 नागरिकांनी दिलेले पत्ते अपूर्ण आहेत, तर काहींची घरं बंद आढळून आली आहेत. काही प्रवाशांचे दूरध्वनी बंद असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.
इंग्लंडहून नागपूरला आलेल्या आई आणि मुलीला कोरोना , जिनोम सिक्वेन्सिंगला पाठवण्यात आले नमुने
परदेशातून आलेल्या या प्रवाशांचाही लवकरच शोध घेतला जाईल. या 12 नागरिकांपैकी बहुतांश डोंबिवलीतील रहिवासी आहेत. 1 दक्षिण आफ्रिका, 4 नायजेरिया, 1 रशिया, 1 नेपाळ, 2 दुबईहून आलेले आहेत. आतापर्यंत विदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या 8 नागरिकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तर एका नागरिकाचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. 9 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं महापालिका प्रशासनाने म्हटलं आहे.