मोदी सरकारचं जनतेला दिवाळी गिफ्ट! उत्पादन शुल्कात कपात केल्याने पेट्रोल-डिझेल उद्यापासून होणार स्वस्त
मोदी सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले पाहण्यास मिळणार आहेत. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 5 रूपये तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रूपयांनी कमी करण्यात आलं आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल […]
ADVERTISEMENT

मोदी सरकारने जनतेला दिवाळी गिफ्ट दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलवरच्या उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यामुळे दिवाळीत पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले पाहण्यास मिळणार आहेत. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पेट्रोलवरचं उत्पादन शुल्क 5 रूपये तर डिझेलवरचं उत्पादन शुल्क 10 रूपयांनी कमी करण्यात आलं आहे. मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार आहे.
डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात पेट्रोलच्या दुप्पट आहे. लॉकडाऊनच्या काळातही भारतीय शेतकऱ्यांनी त्यांच्या कठोर परिश्रमाने आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवला आहे आणि आगामी रब्बी हंगामात डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केल्याने शेतकऱ्यांना चालना मिळणार आहे.
अलिकडच्या काही महिन्यांमध्ये जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. परिणामी, अलिकडच्या आठवड्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या देशांतर्गत किंमतीमध्ये महागाईचा दबाव वाढला होता. जगाने सर्व प्रकारच्या ऊर्जेची कमतरता आणि वाढलेली किंमत देखील पाहिली आहे. देशात ऊर्जेचा तुटवडा भासणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेल यासारख्या वस्तू आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न केले आहेत. त्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.