Raigad जिल्ह्यात Corona च्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव, एकाचा मृत्यू

मुंबई तक

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. यामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात दोन रूग्णांना कोरोनाच्या डेल्टा प्लस या विषाणूची लागण झाली. यामध्ये 69 वर्षीय पुरुष आणि 44 वर्षीय महिलेचा समावेश होता. यापैकी 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर महिलेवर उपचार सुरू आहे. पुरुष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. यामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात दोन रूग्णांना कोरोनाच्या डेल्टा प्लस या विषाणूची लागण झाली. यामध्ये 69 वर्षीय पुरुष आणि 44 वर्षीय महिलेचा समावेश होता. यापैकी 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर महिलेवर उपचार सुरू आहे. पुरुष रूग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे स्वॅब टेस्ट डेल्टा प्लस असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही रूग्णांच्या संपर्कातील 25 जणांचे स्वॅब पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

आजच मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा बळी गेल्याची घटना समोर आली. त्यापाठोपाठ आता रायगडमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 63 वर्षांची ही महिला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने ग्रासली होती. ही महिला फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होती त्यामुळे अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळली होती. तिच्या घरी ती ऑक्सिजनवर होती. आता या महिलेचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात बुधवारी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 20 रूग्ण आढळले. यामध्ये मुंबईत 7, पुणे 3, रायगड, पालघर, नांदेड, गोंदिया या ठिकाणी प्रत्येकी दोन आणि चंद्रपूर आणि अकोला या ठिकाणी प्रत्येकी 1 रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट रूग्णांची संख्या 64 झाली आहे. यापैकी आता रायगड जिल्ह्यात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटला केंद्रीय आरोग्य विभागाने व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत टाकलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp