रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करु शकतं, कृषी मंत्री तोमर आक्रमक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शेती पाण्यावर होते मात्र रक्ताने शेती करण्याचं काम फक्त काँग्रेसच करु शकतं. भाजपला हे कधीही जमणार नाही असं म्हणत आज केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर हे राज्यसभेत चांगलेच आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले. शेतकऱ्यांची माथी भडकवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. उद्योजक तुमची जमीन घेऊन टाकतील असं सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांना जेव्हा हे विचारलं गेलं की या कायद्यांमध्ये काय त्रुटी आहेत? तेव्हा शेतकरी ते सांगू शकले नाहीत असंही तोमर यांनी राज्यसभेत म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांमधील शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. कृषी कायदे तातडीने रद्द करण्यात यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी फक्त कायदे रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसले आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चेची सगळी दारं खुली ठेवली आहेत. आम्ही कायद्यांमध्ये बदल करण्यास तयार आहोत याचा अर्थ असा लावला जाऊ नये की कायद्यांमध्ये चूक आहे. आम्ही आजवर अनेकदा सांगितलं आहे की एपीएमसी संपुष्टात येणार नाही तरीही काही लोक जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम करत आहेत असाही आरोप तोमर यांनी केला.

गेल्या 72 दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. कृषी कायदे तातडीने रद्द करण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चेच्या 11 फेऱ्या पार पडल्या आहेत. मात्र यामधून काहीही निष्पन्न झालेलं नाही. राज्यसभेत शेतकऱ्यांच्या आंदोलनावर चर्चा सुरु असताना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT