Sameer Wankhede: ‘तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहितीय’, क्रांतीने शेअर केली खास पोस्ट

मुंबई तक

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drugs) प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या अटकेनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे प्रचंड चर्चेत आले. आर्यन खानची अटक, ड्रग्स प्रकरण यामुळे सुरुवातीला समीर वानखेडे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. मात्र, याप्रकरणी […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स (Mumbai Cruise Drugs) प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या अटकेनंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे प्रचंड चर्चेत आले. आर्यन खानची अटक, ड्रग्स प्रकरण यामुळे सुरुवातीला समीर वानखेडे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. मात्र, याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दररोज पत्रकार परिषदांमधून समीर वानखेडेंवर अत्यंत गंभीर आरोप करणं सुरु केलं.

अखेर आता एनसीबीने आर्यन खान तपास प्रकरण हे समीर वानखेडेंकडून काढून घेतलं आहे. दरम्यान या सगळ्यात आता समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने आता एक खास फोटो शेअर केला ज्यासह तिने खास पोस्टही शेअर केली आहे.

समीर वानखेडे यांनी आर्यन खानवर केलेली कारवाई खोटी आहे, समीर वानखेडे मूळचे मुस्लिम असून नंतर त्यांनी धर्म परिवर्तन करुन IRS ची नोकरी मिळवली. असे एक ना अनेक आरोप त्यांच्याविरोधात होत असताना आता क्रांती रेडकर यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर पती समीर वानखेडे यांना औक्षण करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या फोटोसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये क्रांतीने असं म्हटलं आहे की, ‘तू देशासाठी किती जीव तोडून काम करतोस हे फक्त मलाच माहिती’ असं म्हणत क्रांतीने आपल्या पतीची पुन्हा एकदा पाठराखण केली आहे. एकीकडे नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर हल्लाबोल सुरु असताना दुसरीकडे क्रांती रेडकर सातत्याने समीर वानखेडेंची बाजू मांडत होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp