Operation airlift Kabul IAF:’ते’ 120 लोकं काबूलहून भारतात कसे पोहचले?, थरारक Inside Story

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: अफगाणिस्तान (Afghanistan) तालिबानच्या (Taliban) ताब्यात गेल्यानंतर मंगळवारी 120 भारतीयांना (120 Indian) मायदेशी सुखरुपपणे परत आणण्यात आलं आहे. भारतीय हवाई दलाचे (IAF) C-17 हे विमान सोमवारी सकाळी काबूलहून निघालं होते. यामध्ये भारतीय दूतावासाचे कर्मचारी, तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि काही भारतीय पत्रकारांना परत आणण्यात आलं आहे. पण या भारतीय नागरिकांचा हा प्रवास वाटतो तेवढा सोप्पा अजिबात नव्हता. त्यामुळे जाणून घेऊयात त्यामागची नेमकी Inside Story.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिकांना परत आणताना एअर फोर्सने पाकिस्तानच्या एअर स्पेसचा वापर केला नाही. कारण आयटीबीपीचे कमांडो शस्त्रास्त्र घेऊन भारतात परतत होते. यामुळेच दुसरा मार्ग वापरण्यात आला. यावेळी ITBP चे सर्व कमांडो त्यांच्या शस्त्रासह भारतात दाखल झाले आहे. या दरम्यान ITBP च्या सर्व आवश्यक वस्तू देखील भारतात आणल्या गेल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळ अमेरिकन फोर्सेसने आयटीबीपी अधिकाऱ्यांकडून स्निफर डॉग्सविषयी माहिती मागितली होती. भारताच्या या तुकडीसह 3 स्निफर डॉग कमांडोही परतले आहेत. हे श्वान कमांडो आयटीबीपी टीमसोबत काबूल दूतावासाच्या सुरक्षेसाठी तैनात होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नाटो सैन्याने विमानतळावरून नागरिकांना बाहेर काढले

ADVERTISEMENT

‘आज तक’ सोबत बोलताना ITBP कमांडोंनी माहिती दिली की, भारतीय दूतावासाच्या बाहेर आणि जवळपासच्या परिसरावर तालिबान्यांनी कब्जा केला आहे. यामुळे विमानतळावर खूपच गोंधळ उडालेला आहे. पण आता नाटो सैन्याने नागरिकांना तिथून बाहेर काढले आहे. दूतावासात काम करणारा इलेक्ट्रीशियनसोबत ‘आज तक’ने बोलताना सांगितलं की, त्याला तिथून आपलं सामान देखील घेऊन येता आलं नाही. फक्त आपले काही कपडे त्याला सोबत आणता आले आहेत. आता भारतीय दूतावास सध्या तालिबानच्या ताब्यात आहे.

ADVERTISEMENT

दूतावास गाठण्यासाठी भारताने मुत्सद्देगिरीचा पुरेपूर वापर केला आणि त्यांना अमेरिकन सैन्याने मार्ग उपलब्ध करून दिला. आयटीबीपीचे सर्व कमांडो सर्व उपकरणे आणि शस्त्रासह विमानतळावर आले. त्यांनी भारतातील दूतावास आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी असं केलं. यानंतर ऑपरेशन ‘एअरलिफ्ट काबूल’ सुरू झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले C-17 विमानाने हिंडनमधून उड्डाण केले, ज्यामध्ये गरुड कमांडो देखील होते. सोमवारी संध्याकाळी 4.20 वाजता C-17 ग्लोब मास्टर विमानाने उड्डाण केले. याच विमानात पूर्ण तयारीने हवाई दलाची (Air Force) टीम पूर्ण तयारीने गेली होती. यावेळी भारतीय हवाई दलाच्या विमानांनी इराण आणि पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर केला नाही. हवाई दलाचे विमान प्रथम ओमान आणि पर्शियन गल्फ मार्गे तजाकिस्तानला पोहोचले.

नाटो सैन्याने मंजुरी दिल्यानंतर भारतीय विमान उतरले काबूल विमानतळावर

तजाकिस्तानलाहून भारतीय विमान मंगळवारी सकाळी काबूल विमानतळावर पोहोचले. नाटो सैन्याने विमान उतरविण्यास मंजुरी दिल्यानंतर भारतीय विमान हे काबूल विमानतळावर उतरले. या दरम्यान नाटो सैन्याने काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारताला मदत केली. सुमारे 148 भारतीयांना कारमधून दूतावासातून विमानतळावर नेण्यात आलं. यासाठी नाटो सैन्याने त्यांना विमानतळापर्यंत विशेष पॅसेज दिला होता.

हा ताफा मंगळवारी सकाळी 7:30 वाजता विमानतळावर पोहोचला आणि त्यानंतर C-17 ग्लोबमास्टरने भारतासाठी उड्डाण केले. यामध्ये दूतावासाशी संबंधित अधिकारी, 100 ITBP कर्मचारी आणि काही पत्रकार आणि इतर लोक या विमानात होते. काबूल सोडल्यानंतर C-17 ग्लोबमास्टर सकाळी 11:00 च्या सुमारास जामनगर हवाई दलाच्या बेसवर पोहोचले. हे विमान जामनगरहून हिंडन एअरबेसकडे दुपारी 3.15 वाजता निघाले आणि संध्याकाळी 5:15 वाजता हिंडन एअर फोर्स स्टेशनवर पोहोचले.

Taliban First PC : काय असेल तालिबानचं रूप? महिला, विदेशी याबाबत काय भाष्य करण्यात आलं?

परराष्ट्रमंत्र्यांनी स्वत: ठेवलं होतं ऑपरेशनवर लक्ष

‘इंडिया टुडे’ला मिळालेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनची तीन मुख्य केंद्रे होती. काबूलमधील भारतीय दूतावास, कॅबिनेट, सचिव आणि परराष्ट्र मंत्रालय. परराष्ट्र मंत्री UNSC च्या बैठकीसाठी न्यूयॉर्कला जात होते पण तरीही ते परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या या प्रवासादरम्यान ते सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि सूचना देत होते. ऑपरेशन दरम्यान त्यांचे दोन मुख्य गोष्टींकडे लक्ष होते. एक म्हणजे मिशन टू एअरपोर्ट आणि दुसरं म्हणजे एअरपोर्ट टू इंडिया असे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT