Osmanabad : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार, थोडक्यात वाचला प्राण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गणेश जाधव, उस्मानाबाद

राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) जिल्हा कार्याध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. बिक्कड यांच्या गाडीवर 2 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी ही गाडीच्या समोरच्या काचावर मध्यभागी लागली, तर एक गोळी चालकाच्या बाजूला लागल्या आहेत. या जिवघेण्या हल्ल्यात बिक्कड हे थोडक्यात बचावले असून, ते सुखरूप आहेत. 

पारा -फक्राबाद रोडवर बिक्कड हे त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला होता पण ते आता सुखरूप आहेत. हल्ल्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांची गाडी नेण्यात आली आहे या हल्ल्यातुन बालबाल बचावल्यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून हल्ला नेमका कोणी व कशासाठी केला हल्लेखोर कोण होते याची माहिती मिळू शकलेली नाही. हल्ला करण्याचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या सर्व घटनेनंतर बिक्कड याच्या समर्थकांनी एकच गर्दी केली. सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांना शांतता राखण्याचे आव्हान नितीन बिक्कड यांनी केले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. वाशी पोलीस या गोळीबार प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दरम्यान काल मनसेचे डॅशिंग नगरसेवक आणि पुणे शहराचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांच्या मुलाला धमकीचे पत्र मिळाले होते. याची माहिती वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट करत दिली होती. इतकंच नाहीतर वसंत मोरेंनी धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाला इतकंच लक्षात ठेव त्याचा बाप वसंत मोरे आहे असा इशाराही दिला होता. वसंत मोरेंनी पुण्याच्या भारती विद्यापिठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT