Ajit Pawar: “५० खोके एकदम ओके” ही आमची घोषणा शिंदे गटाला चांगलीच झोंबली
५० खोके एकदम ओके ही घोषणा शिंदे गटाच्या आमदारांना चांगलीच लागली त्यामुळेच बुधवारी राडा झाला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अधिवेशन पार पडलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला विरोधकांनी दिलेली ही घोषणा झोंबली. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याची परंपरा नाही. मात्र आमची घोषणा चांगलीच मनाला लागली म्हणून ही कृती त्यांनी […]
ADVERTISEMENT

५० खोके एकदम ओके ही घोषणा शिंदे गटाच्या आमदारांना चांगलीच लागली त्यामुळेच बुधवारी राडा झाला असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. अधिवेशन पार पडलं आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला विरोधकांनी दिलेली ही घोषणा झोंबली. त्यामुळेच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्याची परंपरा नाही. मात्र आमची घोषणा चांगलीच मनाला लागली म्हणून ही कृती त्यांनी केली असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
आत्ताचं सरकार येऊन ५० दिवस झाले आहेत पण अधिवेशनात पूर्वीच्याच सरकारचे निर्णय
आत्ताचं सरकार येऊन फक्त ५० दिवस झाले आहेत. त्यामुळे अधिवेशनातल्या अनेक गोष्टी या उद्धव ठाकरेंच्या काळातल्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातल्याच होत्या. आम्ही अधिवेशनात कोणतीही गडबड होऊ दिली नाही कामकाज चालू द्यायचं ही भूमिका आम्ही घेतली होती असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आम्ही वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून आम्ही कामकाज कसं होईल याकडेच आम्ही लक्ष दिलं.
आम्ही सभागृहात कामकाज चालू दिलं, घोषणाबाजी बाहेर केली
आम्ही सभागृहात आलेल्या ९ बिलांवर चर्चा केली. सर्वात लक्षात आणून देण्याचं काम म्हणजे कुठल्याही प्रकारे गालबोट अधिवेशनाला लागलं नाही. बुधवारी एक प्रसंग घडला त्यावेळी वादावादी झाली. महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या परंपरेला गालबोट लागेल का अशी शंका वाटत होती. पण तसं काही आम्ही घडू दिलं नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. सरकारमधल्या लोकांनी सांगितलं की आम्ही आरेला कारे करणार. पण आम्हाला कुणालाच तो विषय वाढवायचा नव्हता असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांना अधिकची मदत करा, ओला दुष्काळ जाहीर करा सांगितलं होतं. मात्र ते काही झालं नाही. आम्ही हेक्टरी ७५ हजार रूपये आणि फळबागांना दीड लाखांपर्यंतची मदत मागितली मात्र ती त्यांनी दिली नाही. या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी, अल्पसंख्य, महिलांचे प्रश्न मांडले. कायदा सुव्यवस्थेचा मुद्दाही आम्ही उपस्थित केला होता अशीही माहिती अजित पवार यांनी दिली.
सध्याच्या सरकारने त्यांना योग्य वाटतील अशी उत्तरं दिली मात्र ते काही फारसं समाधानकारक नव्हतं. दरवेळी आम्ही नवीन आहोत हे सांगितलं गेलं. ५० दिवसात १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत ही बाब आम्ही सरकारला लक्षात आणून दिली. वीजेची करंट असलेली तार तोंडात घेऊनही शेतकऱ्याने जीवन संपवलं असं राज्याच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.