Paatal Lok Season 2 : 'पाताल लोक सीजन 2' ची खतरनाक स्टोरी, काय म्हणतोय हाथीराम चौधरी? टीझरमुळे वाढला सस्पेन्स
चेहऱ्यांवर जखमा असलेला हाथीराम चौधरी अर्थातच अभिनेता जयदीप लिफ्टमध्ये चढताना दिसतो. त्यानं नेहमीच्या स्टाईलमध्ये पॅन्ट-शर्ट आणि जॅकेट घातलं आहे. लिफ्टमध्ये गेल्यावर जयदीप एक गोष्ट सांगायला सुरूवात करतो.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाताल लोक सीजन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
हाथीराम चौधरीने सांगितली सीजन 2 ची स्टोरी
पाताल लोक सीजन 2 च्या रीलीजची तारीखही सांगितली
अमेझॉन प्राइम व्हिडिओच्या सर्वात लोकप्रिय वेब सिरीजपैकी एक 'पाताल लोक'चा सीझन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतातल्या हिंदी वेब सिरीजच्या जगतात सर्वात जास्त चर्चा झालेल्या सस्पेन्स, थ्रीलर वेब सिरीजपैकी एक पाताल लोक ही वेब सिरीज आहे. प्रेक्षक या सीजन 2 ची मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होते.चाहत्यांचा उत्साह वाढवत निर्मात्यांनी 'पाताल लोक 2' चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरमध्ये तुम्हाला अभिनेता जयदीप अहलावत आणि सिरीजचा मुख्य नायक हाथीराम चौधरीच्या भूमिकेत दिसणार आहे. जयदीपने पाताल लोकला जाण्यासाठी लिफ्ट पकडली असून, भयानक असा थ्रीलर तुम्हाला सीजन 2 मध्ये पाहायला मिळणार असल्याचं दिसतंय.
कसा आहे टीझर?
चेहऱ्यांवर जखमा असलेला हाथीराम चौधरी अर्थातच अभिनेता जयदीप लिफ्टमध्ये चढताना दिसतो. त्यानं नेहमीच्या स्टाईलमध्ये पॅन्ट-शर्ट आणि जॅकेट घातलं आहे. लिफ्टमध्ये गेल्यावर जयदीप एक गोष्ट सांगायला सुरूवात करतो.
हे ही वाचा >> Mumbai Crime News : आई आपल्या बहिणींवर प्रेम करते, आपल्यावर करत नाही म्हणत पोटच्या मुलीने आईलाच संपवलं
इन्सपेक्टर गोष्ट सांगायला सुरूवात करतो. तो एका गावात राहणाऱ्या एका माणसाला कीड्यांचा राग असतो. तो कीड्यांपासून दूर राहतो. जेव्हा कधी कीडा दिसला, तेव्हातो कीड्याला मारतो. एक दिवस एक कीडा त्या माणसाच्या घरात घुसतो. त्याला मारल्यानंतर तो हीरो बनल्याचं फील करतो. काही दिवस शांत झोप लागते. पण नंतर त्याच्या घरात किडे दिसतात. पण यावेळी फक्त एक कीडा नसतो.लाखो कीडे असतात...'तुम्हाला काय वाटलं एक कीडा मारला तर सगळं संपेल? पाताललोकमध्ये असं नसतं, असं म्हणत हाथीराम चौधरीने उत्सुकता आणखीच वाढवली आहे.
हे ही वाचा >> Sudarshan Ghule Arrested : संतोष देशमुख प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला SIT कडून अटक
एकूणच, पाताल लोकच्या पहिल्या सीजमध्ये थ्रीलर, अॅक्शन आणि सस्पेन्सचा भन्नाट घटनाक्रम होता. त्यानंतर आता सजीन दोनमध्येही सस्पेन्स आणि अॅक्शनचा डबलडोस असण्याची शक्यता आहे. एकूणच टीझरमधून समोर आलेल्या कथेनुसार हाथीराम चौधरीला आता लाखो गुन्हेगारांचं जग पाहायला मिळेल, त्यातल्याच अनेक केसेस त्याला हादरवून सोडतील असं दिसतंय. येत्या 17 जानेवारीला तुम्हाला पाताल लोकचा सिझन 2 पाहायला मिळणार आहे.









