Sudarshan Ghule Arrested : संतोष देशमुख प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला SIT कडून अटक
Santosh Deshmukh Case Beed : पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केली आहे. ही या एकूण प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट असून, सुदर्शन घुले या प्रकरणातील मुख्य आरोपी होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
SIT ची सर्वा मोठी कारवाई, मुख्य आरोपीला अटक
संतोष देशमुख खून प्रकरणी सुदर्शन घुलेला अटक
डॉ. वायबसेच्या चौकशीनंतर पोलिसांची कारवाई
बीड पोलिसांच्या विशेष पथकाने सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना अटक केली आहे. ही या एकूण प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट असून, सुदर्शन घुले या प्रकरणातील मुख्य आरोपी होता. याप्रकरणी पोलिसांनी कालच एका डॉक्टरला ताब्यात घेतलं होतं. याच डॉक्टर वायबसे यांनी आरोपी सुदर्शन घुलेला पळून जाण्यात मदत केल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानंतर आता काहीवेळापूर्वीच पोलिसांनी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी फक्त एका आरोपीची अटक बाकी आहे.
हे ही वाचा >> वाल्मिक कराडला आहे 'हा' आजार... नेमकं काय होतं त्यात?
बीडच्या मयत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बीड एस. आय. टी. च्या तपासात मोठी अपडेट समोर आली असून, मुख्य आरोपी सापडला आहे. सरपंच हत्याकांडातील संशयित डॉ.संभाजी वायबसे याला चौकशीसाठी पोलिसांनी काल ताब्यात घेतलं होतं. डॉ. वायबसे यांना नांदेडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर पुढच्या लिंक मिळाल्या आणि सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली. त्यामुळे वायबसेंनीच ही माहिती दिल्याची शक्यता आहे.
डॉ. वायबसे हे केज तालुक्यातील कासारीचे असून, त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय होता. एसआयटीकडून आरोपींची कसून चौकशी केली जात होती, त्यानेच दोन्ही आरोपींची माहिती दिल्याची शक्यता आहे. त्यानंतर आता हे दोन आरोपी सापडले आहेत. आता फक्त कृष्णा आंधळे हा एकच आरोपी फरार आहे. पोलीस त्याच्याही लवकरच मुस्क्या आवळतील अशी शक्यता आहे.
पो.स्टे.केज (जि.बीड) गुरनं 637/2024 कलम 103(2),140(1),126, 118(1),34(4),324(4)(5), 189(2), 190 भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल गंभीर व संवेदनशील गुन्हयात मयत सरपंच कै.संतोष देशमुख रा.मस्साजोग यांचे खुनातील फरार आरोपी अटक करण्यासाठी बीड पोलीसाचे विशेष शोध पथक नेमण्यात आले होते.










